Brad Hogg Mumbai Indians IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगमाला दिमाखात सुरुवात झाली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने विजयी लय कायम ठेवली आहे. पण पाच वेळच्या विजेत्या मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला. या सामन्यात मुंबईची गोलंदाजी कमकुवत आणि दुबळी जाणवली. मुंबईचा पुढील सामना चेन्नईच्या विरोधात आहे. त्यापूर्वी नेट्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉज याने मुंबईच्या गोलंदाजांना गोलंदाजीचे धडे दिले आहेत. मुंबई इंडियन्सने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 



ब्रॅड हॉज याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना फिरकीचे धडे दिले. मुंबईचे लेग स्पिनर्स कुमार कार्तिकेय आणि  राघव गोयल यांवा गोलंदाजीचे धडे दिले. यावेळी राघव आणि कार्तिकेय यांनी ब्रॅड हॉजसोबतचा आपला अनुभव शेअर केला. ब्रॅड हॉजकडून खूप काही शिकता आले, अशी प्रतिक्रिया दोन्ही गोलंदाजांनी दिली. लेग स्पिनरला फिरकीच्या काही टिप्स देण्यासाठी आलोय, असे ब्रॅड हॉज म्हणाला.. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ब्रॅड हॉज याने यावेळी राघव आणि कार्तिकेय यांच्या गौलंदाजीचे कौतुक केले..


पाहा मुंबईने पोस्ट केलेला व्हिडीओ.. नेमकं व्हिडीओत आहे तरी काय?


 






आठ एप्रिल रोजी मुंबई वानखेडे मैदानावर चेन्नईसोबत दोन हात करणार आहे. मुंबई पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल. तर चेन्नई विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चेन्नईविरोधात होणाऱ्या सामन्यापूर्वी मुंबईच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी कसून सराव केला. मुंबईने सोशल मीडियावर प्रॅक्टिसचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 






ब्रॅड हॉज कोण आहे ?


ब्रॅड हॉज हा ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फिरकीपटू आहे. ब्रॅड हॉज याने ऑस्ट्रलियासाठी सात कसोटी सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात ब्रॅड हॉज याने १५६ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये ब्रॅड हॉज याने २३ विकेट घेतल्या आहेत.


आणखी वाचा :


IPL 2022 : 'चेज मास्टर' गुजरात, आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना फक्त मुंबईकडून पराभव