IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईचा दारुण पराभव झाला. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईची गोलंदाजी दुबळी अन् कमकुवत जाणत होती. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहची कमी आरसीबीविरोधात मुंबईला जाणवली असेल. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. आता मुंबईचा पुढील सामना चेन्नईविरोधात आठ एप्रिल रोजी होणार आहे. त्यापूर्वी मुंबईने परिपूर्ण तयारी सुरु केली आहे. याच तयारीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. मुंबईच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने नेट्समध्ये यॉर्कर चॅलेंज घेतले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई इंडियन्सने Watch your toes 🚫 या कॅप्शनखाली हा व्हिडीओ पोस्ट केलाय. तसेच आफले पेसर्स यॉर्कर चॅलेंजवेळी फॉर्मात आहेत. अशेही कॅप्शनमध्ये लिहिलेय. या व्हिडीओत अर्जुन तेंडुलकरही भन्नाट गोलंदाजी करताना दिसत आहे. अर्जुन तेंडुलकर याने भेदक यॉर्करने स्टम्प उखाडला. अर्जुनशिवाय मुंबईच्या इतर गोलंदाजांनीही यामध्ये सहभाग घेतला होता. मुंबईने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ...
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. अर्जुन अचूक टप्प्यावर मारा करत असल्याचे अनेकांनी म्हटलेय. अर्जुन तेंडुलकर प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरु शकतो, असेही नेटकऱ्यांनी म्हटलेय. अर्जुन तेंडुलकर मागील काही हंगमापासून मुंबईच्या संघासोबत आहे. पण अद्याप त्याला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. अर्जुन तेंडुलकर गोलंदाजीसोबत तळाला चांगली फटकेबाजी करण्यातही माहिर आहे. त्यामुळे पुढील काही सामन्यात अर्जुनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
आठ एप्रिल रोजी मुंबई वानखेडे मैदानावर चेन्नईसोबत दोन हात करणार आहे. मुंबई पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल. तर चेन्नई विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चेन्नईविरोधात होणाऱ्या सामन्यापूर्वी मुंबईच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी कसून सराव केला. मुंबईने सोशल मीडियावर प्रॅक्टिसचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत.