Rohit Sharma, IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळण्यास अवघे काही तास लागले आहे. मुंबईचा पराभव करत गुजरातने फायनलमध्ये धडक मारली. रोहित शर्माची खराब फलंदाजी, मुंबईच्या पराभवाचं प्रमुख कारण आहे. रोहित शर्मा याला यंदा आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. रोहित शर्मा याला 16 सामन्यात फक्त दोन अर्धशतके झळकावता आली आहेत. त्याशिवाय दरम्यान रोहित शर्माची फलंदाजी सरासरी 21 पेक्षा कमीच होती. हे आकडे रोहित शर्माला साजेशी नाहीत.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याची बॅट शांतच आहे. मागील दोन वर्षांपासून रोहित शर्मा याला आयपीएलमध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा याला गेल्यावर्षी 300 धावांचा टप्पाही पार करता आला नव्हता. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही रोहित शर्मा याची बॅट शांतच राहिली. रोहित शर्मा याने 16 सामन्यात 20.75 च्या सर्वसामान्य सरासरीने फक्त 332 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 65 इतकी राहिली.  रोहित शर्मा याने 16 सामन्यात 17 षटकार आणि 35 चौकार लगावले आहेत. तर फिल्डिंग करताना फक्त एक झेल घेतलाय.  रोहित शर्माची सरासरी त्याच्या लौकिकास साजेशी नाही.

गेल्यावर्षी रोहितची कामगिरी कशी होती ---

गतवर्षीही रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. रोहित शर्माने गेल्यावर्षी 14 सामन्यात 268 धावा केल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे.. गेल्यावर्षी रोहित शर्माला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. गेल्यावर्षी रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या 48 इतकी होती. रोहित शर्माने गेल्यावर्षी 19 च्या सरासरकीने आणि 120 च्या स्ट्राईक रेटने 268 धावा केल्या होत्या. गेल्यावर्षी रोहित शर्माने 13 षटकार आणि 28 चौकार लगावले होते. रोहित शर्माने गेल्यावर्षी फक्त सात झेल घेतले होते. 

आयपीएलमधील रोहित शर्माची कामगिरी कशी ?

रोहित शर्मा याने 243 सामन्यात 6211 धावा केल्या आहेत. यादरम्यान एक शतक आणि 42 अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये 257 षटकार लगावले आहेत. रोहित शर्माच्या बॅटमधून 554 चौकार निघाले आहेत.

रोहित शर्मा याचे संपूर्ण आयपीएल करिअर -
YEARMATNORUNSHSAVGBFSR100504S6SCTST
Career243286211109*29.584776130.05142554257980
20231603326520.75250132.8002351710
20221402684819.14223120.1800281370
20211303816329.30299127.4201331410
20201203328027.66260127.6903271960
20191514056728.92315128.5702521040
20181422869423.83215133.0202251280
20171723336723.78273121.9703319100
201614348985*44.45368132.8805491620
201516248298*34.42333144.7403412150
201415239059*30.00302129.1303311650
201319553879*38.42409131.5404352870
2012172433109*30.92342126.60133918130
20111633728733.81297125.2503321370
20101624047328.85302133.7703361490
20091633625227.84315114.9201221850
200813140476*36.72273147.9804381980

आणखी वाचा :

CSK IPL Records: धोनीच्या चेन्नईचा बोलबाला! CSK चे 5 विक्रम माहित आहेत का ?

गुजरात की चेन्नई कोण मारणार बाजी? 2008 पासून कोणत्या संघाने चषक उंचावला, वाचा एका क्लिकवर

IPL 2023 : चेन्नईच्या कोणत्या किंगची सुपर कामगिरी, पाहा संपूर्ण आकेडावारी एका क्लिकवर

आयपीएलमध्ये चेन्नईच किंग्स, सर्वाधिक फायनल खेळणारा संघ, पाहा CSK ची आतापर्यंतची कामगिरी

GT in IPL 2023: हार्दिकची टोळी दुसऱ्यांदा फायनलमध्ये, टायटन्सपुढे किंग्सचे आव्हान, पाहा गतविजेत्याचा यंदाचा प्रवास

IPL मध्ये पैशांचा पाऊस, विजेत्याला 20 कोटी, मुंबईला 7 कोटी; पर्पल-ऑरेंज कॅप जिंकणाऱ्याला किती रुपये? 

पर्पल-ऑरेंज कॅप टायटन्सकडेच, हार्दिकच्या टोळीत कुणाची कामगिरी कशी, वाचा एका क्लिकवर

WTC विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पण IPL विजेत्यापुढे ही रक्कम किरकोळ