Kavya Maran in South Africa T20 League : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसाठी सुरु लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक पैसे घेऊन सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ उतरला. दरम्यान टीमची सीईओ काव्या मारन (Kavya Maran) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने लिलावात सुरुवातीपासून बक्कळ पैसा खर्च केला. सर्वात आधी म्हणजे सुरुवातीच्या राऊंडमध्येच तिने इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुक (Harry Brook) याच्यासाठी तब्बल 13.25 कोटी खर्च केले. या खरेदीनंतर ती आनंदीही दिसली, ज्यानंतर तिने केलेल्या या बेभान खर्चावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. तसंच काही जणांनी पुन्हा एकदा तिच्या लूक्सच्या प्रेमात पडत खास मीम्स शेअर केले आहेत...
सनरायझर्सनं मयांकसाठीही खर्च केले 8.25 कोटी
सनरायझर्स हैदराबादकडे बरेच पैसे या लिलावासाठी शिल्लक असल्यानं त्यांनी बरेच पैसे खर्च करुन खेळाडू विकत घेतले आहेत. यात हॅरीशिवाय भारतीय खेळाडू मयांक अगरवाल यालाही 8.25 कोटींना विकत घेतलं आहे. तर विव्रांत शर्मा या युवा खेळाडूला 2.60 कोटींना खरेदी केलं आहे.
कोण आहे काव्या मारन?
काव्या मारन ही सनरायझर्स फ्रँचायझीची सीईओ आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी असून कलानिधी मारन हे प्रसिद्ध सन ग्रुपचे संस्थापक आहेत. कलानिधी हे विविध दूरचित्रवाणी वाहिन्या, एफएम रेडिओ स्टेशन, डीटीएच सेवा, वर्तमानपत्रे आणि एका फिल्म प्रोडक्शन हाऊसचेही मालक आहेत. काव्या मारन हिला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असल्याने ती आयपीएल दरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या जवळपास सर्व सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये उपस्थित असते. आपल्या संघाला प्रोत्साहन देखील देताना ती दिसून येते. काव्या मारनचे सामन्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ती एक सोशल मीडिया सेन्सेशनही झाली आहे.
हे देखील वाचा-