CSK vs MI IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात रविवारी प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने 206 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 186 धावा करू शकला. मुंबईकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावले. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात रोहित अपयशी ठरला. 


मुंबईकडून रोहित शर्माने एकट्यानं लढा दिला. रोहित शर्मानं शानदार शतकी खेळी केली. पण रोहित शर्माच्या शतकावर एमएस धोनीनं मारलेले तीन षटकार भारी पडले. चेन्नईच्या फलंदाजीवेळी एमएस धोनीनं चार चेंडूचा सामना करताना 20 धावांची खेळी केली. यामध्ये षटकारांची हॅट्ट्रीक केली होती. इतक्याच धावांच्या फरकानं चेन्नईने मुंबईचा पराभव केला. हार्दिक पांड्याच्या चार चेंडूवर धोनीनं 20 धावा केल्या होत्या. 


मुंबईकडून 20 वं षटक हार्दिक पांड्याने टाकल्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकल्याने आकाश माधवालच्या गोलंदाजीवर विश्वास नसणे आणि डेथ ओव्हरचा गोलंदाज म्हणून त्याच्या स्वत:च्या (हार्दिकच्या) कौशल्याचा अभाव दिसून आला, असं मत इरफान पठाणने व्यक्त केलं आहे. 






मुंबईची सुरुवात चांगली झाली होती. त्यासाठी रोहित आणि ईशानने 70 धावांची भागीदारी केली. यानंतर इशान किशन 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. पाथीरानाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईची दुसरी विकेटही 70 धावांवर पडली. सूर्यकुमार आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिसरी विकेट तिलक वर्माच्या रूपाने पडली. 134 धावांवर मुंबईची चौथी विकेट पडली. कर्णधार हार्दिक पांड्या मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. दरम्यान, चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 206 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 69 धावा केल्या. शिवम दुबेने नाबाद 66 धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 


संबंधित बातम्या:


टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान


7 वर्षे डेट, लग्नाआधीच 1 मुलगा; किरॉन पोलार्डची पत्नी आहे मोठ्या ब्रँडची मालकीण, पाहा Photo's


उर्वशी रौतेला ऋषत पंतला नव्हे, तर फुटबॉलपटूला करतेय डेट?; फोटोवरील 'कॅप्शन'ने लक्ष वेधलं!