7 वर्षे डेट, लग्नाआधीच 1 मुलगा; किरॉन पोलार्डची पत्नी आहे मोठ्या ब्रँडची मालकीण, पाहा Photo's
आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्सच्या संघात प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा किरॉन पोलार्ड आगामी ट्वेंटी-20 विश्वचषकात एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-20 विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी पोलार्डची इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
किरॉन पोलार्डची वैयक्तिक आयुष्याची कायम सोशल मीडियावर चर्चा होत असते.
किरॉन पोलार्ड हा जगातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो त्याच्या दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची पत्नी देखील खूप सुंदर आहे, तिचे नाव जेना अली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यादरम्यान किरॉन पोलार्ड आणि जेना अली यांची पहिली भेट झाली होती. ते एका मित्राद्वारे भेटले, त्यानंतर त्यांची मैत्री झाली, जी काही काळानंतर प्रेमात बदलली.
जेना अली आणि किरॉन पोलार्ड जवळपास 7 वर्षे एकमेकांना डेट करत होते. 7 वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी 25 ऑगस्ट 2012 रोजी लग्न केले.
लग्नाआधीच तिला या नात्यातून एक मुलगा झाला, ज्याचे नाव कॅडेन पोलार्ड आहे. किरॉन पोलार्ड आणि जेना अली यांना एकूण 3 मुलं आहेत.
जेना अली व्यावसायिक महिला आहेत. ती KJ Sports & Accessories नावाच्या स्पोर्ट्स ॲक्सेसरीज ब्रँडची मालक आहे, जिचे कार्यालय त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे आहे. जेना अली अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.