IPL Shubman Gill Shah Rukh Khan : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill ) आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करत आहे. याआधी शुभमन गिल कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सदस्य राहिला. 2018 ते 2021 असा चार वर्षे शुभमन गिल कोलकाता संघाकडून खेळला, पण 2022 आयपीएलवेळी कोलकात्यानं शुभमन गिल याला रिटेन केले नाही. पण 2022 आयपीएलवेळी गुजरात टायटन्सने शुभमन गिल याच्यावर डाव खेळला. शुभमन गिल 2022 आणि 2023 या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळला, पांड्या मुंबईच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर गुजरातने यंदा शुभमन गिल याच्याकडे नेतृत्व सोपवलेय. शुभमन गिल याला कोलकात्यानं रिटेन का केले नाही? याबाबत अनेकांना प्रश्न पडला. शुभमन गिल यालाही हा प्रश्न पडलाय. शुभमन गिल आणि कोलकाता यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. प्रसिद्ध गायक एड शीरन याच्यासोबतच्या चर्चेदरम्यान शुभमन गिल यानं केलेली टिप्पणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
शाहरुखला विचारा मला रिटेन का नाही केलं?
एका कार्यक्रमावेळी शुभमन गिल आणि प्रसिद्ध गायक एड शीरन यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुभमन गिल यानं या चर्चेमध्ये कोलकाता नाइट रायडर्सबरोबरचा आपला प्रवास उलगडला. विशेष म्हणजे, शीर याला शुभमन गिल कोलकात्याच्या ताफ्यता होता, हेच माहित नव्हते. शीरन यानं शुभमन गिल याला सांगितलं की, शाहरुख खान आणि मी लवकरच भेटणार आहोत. त्यावर शुभमन गिल यानं शीरन याला म्हटलं की... त्यांना नक्की विचारा मला रिटेन का केले नाही? त्यानंतर शीरन आणि शुभमन गिल एकमेंकाकडे पाहून खळखळून हसू लागले.
गुजरातसाठी शुभमन गिलची शानदार कामगिरी -
केकेआरने रिलेट केल्यानंतर शुभमन गिल गुजरातच्या ताफ्यात 2022 आयपीएलवेळी जोडला गेला. 2022 आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनौ हे दोन नवे संघ दाखल झाले होते. 2022 आणि 2023 या दोन हंगामात शुभमन गिल हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातमध्ये खेळला. पहिल्याच हंगामात गुजरातने चषकावर नाव कोरले होते. शुभमन गिल यानं या विजयात मोठा वाटा उचलला होता. गुजरातकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये शुबमन गिल पहिल्या स्थानावर आहे. दोन्ही हंगामात शुभमन गिल यानं खोऱ्यानं धावा जमवल्या आहेत. गुजरातकडून खेळताना त्याच्या नावावर सध्या 1500 धावांची नोंद आहे. हार्दिक पांड्याने गुजरातची साथ सोडल्यानंतर शुबमन गिल याला कर्णधार केलेय. यंदाच्या हंगामात शुभमन गिल गुजरातची धुरा संभाळतोय.
आणखी वाचा :
IPL 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाला घाबरायचो, चेन्नईच्या प्रशिक्षकच्या वक्तव्यानं खळबळ
IPL Points Table : चेन्नईच्या पराभवाचा फटका गुजरात-पंजाबला, गुणतालिकेत झाला मोठा बदल