IPL 2024 Points Table : पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाने चेन्नईचा (SRH vs CSK) सहा विकेटने पराभव केला. चेन्नईने (CSK) दिलेल्या 166 धावांचे आव्हान हैदराबादने (SRH) 11 चेंडू आणि 6 विकेट राखून सहज पार केले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) शानदार 37 धावांची खेळी केली. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वातील चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव होय. चेन्नईच्या लागोपाठ दोन पराभवानंतर गुणतालिकेत (IPL 2024 Points Table) मोठा बदल झाला आहे. हैदराबाद संघाने चार सामन्यात दुसऱ्या विजयाची नोंद करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. 

हैदराबादची गुणतालिकेत मोठी झेप - 

पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हैदराबादने चार सामन्यात दोन विजय आणि दोन पराभवासह पाचव्या स्थानावर कब्जा मिळवला आहे. हैदराबादने मुंबई आणि चेन्नई या बलाढ्या संघाचा पराभव करत आयपीएल 2024 ची सुरुवात दणक्यात केली आहे. दुसरीकडे चेन्नईला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. चेन्नईने आरसीबी आणि दिल्ली या संघाचा पराभव केला. हैदराबादच्या विजयाचा फटका पंजाब आणि गुजरात संघाला बसला आहे. गुणतालिकेत दोन्ही संघाची घसरण झाली आहे. पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर घसरला आहे, तर गुजरात संघ सातव्या क्रमांकावर घसरला आहे. 

कोलकाता पहिल्या स्थानावर कायम - 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2024 ची शानदार सुरुवात केली आहे. कोलकाता आणि राजस्थान संघाने आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघावर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. दोन्ही संघ स्पर्धेत अजय आहेत. कोलकाता आणि राजस्थान संघाने आतापर्यंत प्रत्येकी तीन तीन सामने जिंकले आहेत. दोन्ही संघाचे प्रत्येकी सहा सहा गुण आहेत. कोलकात्याचा नेटरनरेट शानदार असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. तर राजस्थान संघ दुसऱ्या क्रमांकवर आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, तर लखनौ चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि लखनौच्या नावावर प्रत्येकी चार चार गुण आहेत. 

मुंबईचा संघ तळातच - 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला अद्याप सूर गवसलेला नाही. मुंबईच्या संघाने स्पर्धेतील आतापर्यंतचे तीन सामने गमावले आहेत. 0 गुणांसह मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.  दिल्लीच्या संघाला चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे. दिल्लीचा संघ नवव्या स्थानावर आहे. आरसीबी दोन गुणांसह आठव्या स्थानार आहे. तर गुजरातचा सातव्या स्थानावर आहे. गुजरातने चार सामन्यात दोन विजय आणि दोन पराभव झाले आहेत.

IPL पॉईंट टेबल 

 
क्रमांक संघाचे नाव सामने विजय टाय पराभव गुण

नेटरनरेट

1.
कोलकाता
KKR
3 3 0 0 6 2.518
2.
राजस्थान
RR
3 3 0 0 6 1.249
3.
चेन्नई
CSK
4 2 0 2 4 0.517
4.
लखनौ
LSG
3 2 0 1 4 0.483
5.
हैदराबाद
SRH
4 2 0 2 4 0.409
6.
पंजाब
PBKS
4 2 0 2 4 -0.220
7.
गुजरात
GT
4 2 0 2 4 -0.580
8.
आरसीबी
RCB
4 1 0 3 2 -0.876
9.
दिल्ली
DC
4 1 0 3 2 -1.347
10.
मुंबई
MI
3 0 0 3 0 -1.423