IPL 2023 : आयपीएलमध्ये गुजरात संघाला चेज मास्टर म्हटल्यास वावगे वाटायला नको... कारण गुजरात संघ लक्षाचा पाठलाग करताना 90 टक्के यशस्वी ठरतोय. 2022 पासून गुजरातची विजयी घौडदोड आजही सुरुच आहे. गुजरातने लक्षाचा पाठलाग करताना 12 पैकी 11 वेळा विजय मिळवला आहे. फक्त मुंबईविरोधात गुजरातला लक्षाचा पाठलाग करताना अपयश आले आहे. गुजरातने चेन्नईविरोधोधात सर्वाधिक तीन वेळा यशस्वी लक्षाचा पाठलाग केलाय. लखनौ, पंजाब, हैदराबाद, आरसीबी, राजस्थान, पंजाब आणि दिल्ली या संघाविरोधात गुजरातने यशश्वी लक्षाचा पाठलाग केलाय.
2022 च्या हंगमात गुजरात संघ चषक जिंकेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने हा करिश्मा करुन दाखवला आहे. गुजरातचा संघ चॅम्पियन होण्याचे कारण चेस मास्टर होय... कारण, गुजरातचा संघ अतिशय पद्धशीरपणे धावांचा पाठलाग करतो... प्रत्येक फलंदाज आपले काम चोख बजावतो... एकापेक्षा एक सरस फलंदाज गुजरातकडे आहेत. डेविड मिलर, राहुल तेवातिया आणि राशिद खान या तिघांनी गुजरातला जेच मास्टर करण्यात मोठा वाटा उचलला आहे. धावांचा पाठलाग करताना डेविड मिलर, राहुल तेवातिया अथवा राशिद खान यांच्यापैकी एखादा फलंदाज मैदानावर असतोच. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे.. धावांचा पाठलाग करताना गुजरातने नऊ सामन्यात अखेरच्या षटकात बाजी मारली आहे. आजही पंजाबविरोधात अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली.
गेल्या हंगमात गुजरातने नऊ वेळा धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. यामध्ये त्यांनी आठ सामन्यात विजय मिळवला होता. यंदाच्या हंगमातील तीन सामन्यात गुजरातने यशस्वी धावांचा पाठलाग केला आहे. गुजरातला फक्त मुंबईविरोधात धावांचा पाठलाग करण्यात अपयश आलेय. आयपीएल 2022 मधील 51 व्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सहा विकेटच्या मोबदल्यात 176 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर गुजरातचा संघाला पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. या सामन्याचा अपवाद वगळता गुजरातने आतापर्यंत आयपीएलमध्ये यशस्वी रन चेज केले आहेत. आजही गुजरातने धावांचा पाठलाग करत पंजाबचा पराभव केला. पंजाबविरोधात अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. डेविड मिलर आणि राहुल तेवातिया यांनी गुजरातला विजय मिळवून दिला.