RCB vs GT, IPL 2022 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वातील गुजरात संघाने 20 गुणांसह प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केलाय. पण फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीसाठी आजचा सामना करो या मरो असा आहे. आजच्या सामन्यात आरसीबीला विजय अनिवार्य आहे. करो या मरो सामन्यात आरसीबीची प्रथम गोलंदाजी आली आहे. गुजरात संघाला माफक धावसंख्येवर रोखत मोठा विजय साजरा कऱण्याचा आरसीबीचा निर्धार असेल. निर्णायक सामन्यात आरसीबीलाही प्रथम फंलदाजी करयाची होती. नाणेफेक गमावल्यानंतर फाफने तशी कबुली दिली. नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने झुकलाय. पण सामना कोण जिंकणार हे लवकरच समजेल... 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केलेय. पण फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचाच आहे. गुणतालिकेत गुजरात अव्वल तर आरसीबीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. टॉप 4 मध्ये पोहचण्यासाठी आणि प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी आरसीबीला विजय अनिवार्य आहे. 


निर्णायक सामन्यात आरसीबीच्या संघात एक मोठा बदल करण्यात आलाय. आरसीबीने मोहम्मद सिराजला वगळले आहे, त्याजागी सिद्धार्थ कौलला स्थान दिलेय. सिद्धार्थ कौल यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना खेळत आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघातही एक बदल करण्यात आलाय. गुजरातच्या संघात लॉकी फर्गुसनचं पुनरागमन झालेय तर अल्झारी जोसेफला वगळण्यात आलेय. 


गुजरातची प्लेईंग 11 -
 शुभमन गिल, वृद्धीमान साहा (विकेटकिपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर साई किशोर, लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी, यश दयाल


आरसीबीची प्लेईंग 11 - 
विराट कोहली, फाफ डु प्सेसिस  (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल सोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक(विकेटकिपर), हर्षल पेटल, वानंदु हसरंगा, सिद्धार्थ कौल, जोश हेजलवूड 






हे देखील वाचा-