IPL 2022 : मुंबई इंडियन्स (MI) यंदाच्या हंगामातून बाहेर गेला आहे. पाच वेळा संघाला ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला यंदा प्लेऑफमध्येही पोहोचता आलेले नाही. पण आता रोहित शर्माने पुढील हंगामात कशी रणनीती करणार याबद्दल माहिती दिली आहे. यासाठी उर्वरीत मुंबई इंडियन्सच्या सामन्यांत अधिक नव्या खेळाडूंना संधी देणार आहे. त्यामुळे आता उर्वरीत सामन्यांत कोणा-कोणाला संधी मिळणार याकडे सर्व मुंबई इंडियन्स फॅन्सचे लक्ष्य असणार आहे. मुंबईला नुकताच मंगळवारी हैदराबाद संघाविरुद्ध 3 धावांनी पराभव पत्करावा लागला 


'भविष्यातील सामन्यासाठी अधिक दमदार संघ बनवू'


हैदराबाद विरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) तीन धावांनी पराभूत झाल्यानंतर आता मुंबईला खरचं विचार करण्याीची वेळ आली आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबईचा यंदाच्या हंगामात 13 सामन्यांपैकी 10 सामन्यात पराभव झाला. त्यामुळे आता भविष्यातील सामन्यात आणि पुढील हंगामात योग्य कामगिरी करण्यासाठी मुंबईचा संघ आतापासून पुढील उर्वरीत सामन्यात नवनवीन खेळाडूंना संधी देणार आहे. त्यामुळे भविष्यात आणखी दमदार खेळाडूंना संघात स्थान मिळू शकेल. आता मुंबईचा हंगामातील शेवटचा सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाविरुद्ध असणार आहे.  


हैदराबादविरुद्ध रोमहर्षक सामन्यात पराभव


मुंबईविरुद्ध (Mumbai Indians) सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) उमरान मलिकनं (Umran Malik) चमकदार कामगिरी करून दाखवली. या सामन्यात त्यानं मुंबईच्या तीन महत्वाच्या फलंदाजानं आपल्या जाळ्यात अकडलं. ज्यामुळं हैदराबादच्या संघानं सामन्यावर मजूबत पकड मिळवली. हैदराबादनं दिलेल्या 194 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची दमछाक झाली. मुंबईनं 20 षटकात सात विकेट्स गमावून 190 धावा केल्या. हा सामना हैदराबादच्या संघानं तीन धावांनी जिंकला.  


हे देखील वाचा-