IPL 2023, GT vs CSK : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चेन्नई घरच्या चेपॉक मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.  प्लेऑफमधील पहिलाच सामना आहे. क्वालिफायर एक सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.. पराभूत संघाला एक संधी मिळणार आहे. चेन्नई आणि गुजरात दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. आयपीएलमधील दोन्ही संघाच्या कामगिरीचा विचार केल्यास हार्दिक पांड्याचे पारडे जड दिसतेय. गुजरात आणि चेन्नई आतापर्यंत तीन वेळा आमनेसामने आले आहेत. या तिन्ही सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. आयपीएलमध्ये चौथ्यांदा गुजरात आणि चेन्नई यांच्यात सामना होणार आहे. आजचा सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 


धोनीलाही प्रथम गोलंदाजी करायची होती. चेपॉकच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात धावांचा पाऊस पडतो.. या मैदानावर फिरकीला मदत मिळण्याची शक्यता आहे. धोनीने आजच्या सामन्यात संघात कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवलाय. यंदाच्या हंगामात दहाव्यांदा धोनीने कोणत्याही बदलाशिवाय संघ उतरवलाय. दुसरीकडे मोक्याच्या सामन्यात हार्दिक पांड्याने यश दयाल याला बाहेर बसवलेय.. हार्दिक पांड्याने महाराष्ट्रातील Darshan Nalkande दर्शन नलकांडे याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय. पाहा दोन्ही संघाचे प्लेईंग ११


गुजरातच्या संघात कोण कोण ?


हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दर्शन नळकंडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी


चेन्नईचे धुरंधर कोणते ?


ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोइन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान और विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्ष्णा