IPL 2023, Virat Kohli  : अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीवर सहा विकेटने विजय मिळवला. या पराभवानंतर आरसीबीचे आयपीएलच्या सोळाव्या हंगमातील प्लेऑफचे आव्हान संपले. त्यानंतर विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि मोहम्मद सिराज यांच्यासह संपूर्ण आरसीबीचा संघ नाराज दिसला. विराट कोहली याने मोक्याच्या सामन्यात शतकी खेळी करत लढा दिला.. पण पुन्हा एका आरसीबीचा संघ चषकापासून वंचित राहिला. विराट कोहली याने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानलेत.. तर पुढील हंगामात दणक्यात परतण्याचे अश्वासन दिलेय. 


विराट कोहलीने आज सकाळी ट्विटवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट कोहली म्हणाला की, यंदाच्या  हंगामात बरेच क्षण असे होते की, ते कधीच विसरु शकत नाहीत. सर्वांनी सर्वस्वी प्रय्तन केले.. पण, आमच्याकडून कुठेतरी थोडीफार चूक होते. आम्ही नाराज नक्कीच आहोत.. पण संघाच्या कामगिरीने खूश आहोत. संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचा आभारी आहे.    कोच, मॅनेजमेंट आणि सहकारी खेळाडूचेही आभार... पुढील वर्षी अधिक मजबूतीने परतूयात...तुमचा पाठिंबा असाच राहूद्यात...







कोहलीची वादळी फलंदाजी - 


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विराट कोहली दमदार फॉर्मात होता. विराट कोहलीने यंदा १४ डावात ६३९ धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहलीच्या बॅटमधून यंदा दोन शतक निघालीत आहेत. विराट कोहलीने सहा अर्धशतके आणि दोन शतकाच्या मदतीने ६३९ धावा काढल्यात. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकाच्या विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीच्या नावावर सात शतकांची नोंद आहे. विराट कोहलीने युनिवर्स बॉसचा विक्रम मोडलाय. 


RCB ला पुन्हा एकदा हुलकावणी -


108 कसोटी सामन्यात 48.93 च्या सरासरीने 28 शतकांसह 8416  धावा... २७४ वनडे सामन्यात ५७.३२ च्या सरासरीने ४६ शतकांसह १२८९८ रन्स.. याशिवाय २३७ आयपीएल सामने ७२६३ रन्स, ज्यामध्ये सात शतकं  आणि स्ट्राईक रेट १३० चा... ही अचंबित करणारी आकडेवारी आहे द विराट कोहलीची. धावांची इतकी मोठी लूट करुनही  या धावाधीशाच्या खजिन्याला आयपीएलच्या ट्रॉफीने पुन्हा एकदा हुलकावणी दिलीय.


बंगळुरुच्या मैदानात कोहलीने  रविवारी या हंगामातलं सलग दुसरं शतक ठोकलं आणि प्ले-ऑफच्या आशा पल्लवित केल्या.  पण, शुभमन गिलने त्याला शतकी प्रत्युत्तर देत गुजरातला विजयपथावर नेलं आणि कोहलीच्या टीमसाठी प्ले-ऑफचा दरवाजा बंद केला. ७५ आंतरराष्ट्रीय शतके २५ हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा, ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार त्याशिवाय असे विक्रमांचे महाल रचणाऱ्या कोहलीच्या बंगळुरु टीमने आतापर्यंत तीनदा फायनल गाठलीय तर आणखी पाचदा प्ले-ऑफचं तिकीट मिळवलंय. तरीही आरसीबीचं आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न १६ मोसमांतनंतरही सत्यात उतरलेलं नाही.


सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाची बॅटिंग जोरात असल्याने कोहलीच्या आरसीबीसाठी मग मिम्स फिरले नाही तरच नवल. यंदाच्या मोसमात एका मॅचमध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहलीचा झालेला वादही चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला. कोहली क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये तितक्याच आक्रमकपणे आणि झोकून देत खेळत असतो. आयपीएलची ही निराशा त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात नक्कीच असणार आहे. तरीही जूनच्या पहिल्या आठवड्यात होत असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी त्याने बॅटला धावांची धार काढल्याने टीम इंडियासाठी ही नक्कीच सुखावह बाब म्हणावी लागेल. फक्त ती आयपीएलची ट्रॉफी जोपर्यंत त्याला मिळत नाही... तोवर त्याचे फॅन्स म्हणत राहीतल... कब खौलेगा रे खून तेरा... माँ का बाप का भाई का... सबका बदला लेगा तेरा फैजल