GT vs SRH, Abhishek Sharma Smashed Fifty : मुंबईच्या वानखेडे मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा 40 वा सामना सुरु आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्माने तुफानी फलंदाजी करत हार्दिकचा निर्णय चुकीचा ठरवला. 


युवा अभिषेक शर्माने अनुभवी राशिद खानची गोलंदाजी धू धू धुतली. अभिषेक शर्माने राशिद खानला सहज तीन षटकार लगावले. त्यानंतर सोशल मीडियावर रिअॅक्शनचा पाऊस पडला. प्लावर नही फायर हू... यासारख्या कमेंटसह अभिषेकच्या खेळीचं कौतुक केले गेले. पाहा मिम्स


 






 










अनकॅप भारतीय खेळाडू अभिषेक शर्माने अनुभवी राशिद खानची गोलंदाजी फोडून काढली. अभिषेक शर्माने राशिदला धू धू धतलं. सलामीला आलेल्या अभिषेख शर्माने तुफानी अर्धशतकी खेळी केली. त्याला गुजरातच्या कोणत्याही गोलंदाजाला रोखता आलं नाही. अभिषेक शर्माच्या विस्फोटक फलंदाजीमुळे राशिद खानची गोलंदाजी खराब झाली. अभिषेक शर्माने राशिदच्या 14 चेंडूवर धावांचा पाऊस पाडला. अभिषेकचे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत राशिदला 33 धावा चोपल्या. 


अभिषेक शर्माने गुजरातविरोधात धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा अनकॅप भारतीय खेळाडू राहिलाय. अभिषेक शर्माने आतापर्यंत 285 धावा चोपल्या आहेत. त्यानंतर मुंबईच्या तिलक वर्माने 250 तर राहुल त्रिपाठीने 228 धावा केल्या आहेत. (Uncapped players with Most runs in 2022 IPL)


प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार केन विल्यमसन स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीही बाद झाला. पण एका बाजूला विकेट पडत असताना अभिषेक शर्माने विस्फोटक फलंदाजी केली. अभिषेक शर्माने तुफानी अर्धशतकी खेळी केली. अभिषेक शर्माने 42 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. अभिषेक वर्माने मार्करमसोबत 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अभिषेक शर्माच्या अर्धशतकाने हैदराबादच्या फलंदाजीचा पाया रचला गेला.