RR vs GT: कोलकाता येथील ईडन गार्डन्स वर मंगळवारी खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह गुजरातच्या संघानं अंतिम फेरी गाठली. गुजरात हा आयपीएलच्या स्पर्धेतील पहिला संघ आहे, जो त्यांच्या पदार्पणाच्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचला आहे. या सामन्यात राजस्थाननं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात सहा विकेट्स गमावून गुजरातसमोर 188 धावा केल्या. दरम्यान, डेव्हिड मिलरनं शेवटच्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या तीन चेंडूंवर लागोपाठ तीन षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.


डेव्हिड मिलरचं ट्वीट
दरम्यान, गुजरातच्या  विजयानंतर डेव्हिड मिलरनं राजस्थान रॉयल्सची माफी मागितली. त्यानं ट्विटरवर राजस्थानला टॅग करून सॉरी लिहलं. राजस्थाननंही आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मिलरला मजेशीर उत्तर दिलं आहे. राजस्थाननं रिप्लायमध्ये एक मीम्स टाकला आहे. "दुष्मन न करे दोस्तने जो काम किया है" आयपीएल 2020 आणि 2021 च्या हंगामात डेव्हिड मिलर राजस्थानच्या संघाचा भाग होता. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थाननं 2022 हंगामासाठी मिलरला रिलीज केलं. त्यानंतर गुजरात टायटन्सनं डेव्हिड मिलरला तीन कोटीत विकत घेऊन संघात सामील केलं. महत्वाची बाब म्हणजे,  ऑक्शनच्या पहिल्या फेरीत डेव्हिड मिलरला कोणत्याही संघानं खरेदी केलं नव्हतं. 


मिलरनं कसा सामना फिरवला?
दरम्यान, राजस्थाननं दिलेल्या 189 लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. त्यावेळी डेव्हिड मिलर क्रिजवर होता आणि संजू सॅमसननं चेंडू प्रसिद्ध कृष्णाच्या हाती सोपवला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरनं षटकार मारून सामना गुजरातच्या दिशनं झुकवला. गुजरातला आता जिंकण्यासाठी पाच चेंडू 10 धावांची गरज होती. परंतु, दुसऱ्या चेंडूतही षटकार मारून डेव्हिड मिलरनं सामन्यावर पूर्णपणे कब्जा केला. आता गुजरातला विजयासाठी चार चेंडूत फक्त चार धावा करायच्या होत्या. या षटकातील तिसरा चेंडू देखील डेव्हिड मिलरनं प्रेक्षकांपर्यंत पोहचवत गुजरातला विजय मिळवून दिला. डेव्हिड मिलरच्या सलग तीन चेंडूत तीन षटकार मारून गुजरातच्या संघाला अंतिम फेरीत पोहचवलं. 


गुजरातचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय
दरम्यान, क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात गुजरातच्या संघानं नाणेफेकू जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात सहा विकेट्स गमावून गुजरातसमोर 189 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात डेव्हिड मिलरची वादळी खेळी आणि कर्णधार हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरातनं सात विकेट्स राखून राजस्थानला पराभूत केलं. 


ट्वीट-



हे देखील वाचा-