GT vs RR, IPL 2022 : डेविड मिलरचं वादळी अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या बळावर गुजरातने राजस्थानचा सात विकेट आणि तीन चेंडू राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली. तर राजस्थानचा संघ क्लालिफायर 2 मध्ये खेळणार आहे. 25 मे रोजी होणाऱ्या लखनौ आणि आरसीबी यांच्यातील विजेत्यासोबत क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानचा संघ भिडणार आहे. दरम्यान, मोक्याच्या क्षणी मिलरने नाबाद 68 तर हार्दिक पांड्याने नाबाद 40 धावांची खेळी केली.  आज झालेल्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात... 


189 धावांचा पाठलाग करताना गुजरातचीही सुरुवात खराब झाली.  वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी गुजरातचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी 71 धावांची भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेविड मिलर धावून आले. दोघांनी गुजरातला विजय मिळवून दिला. 


शुभमन गिल-मॅथ्यू वेडने रचला पाया - 
दुसऱ्याच चेंडूवर विकेट पडल्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली. शुभमन गिलने 21 चेंडूत 35 धावांची खेळी केली. तर मॅथ्यू वेडने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली.  


हार्दिक पांड्या-डेविड मिलरने कळस चढवला-
गिल आणि वेड यांनी पाया रचल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेविड मिलर यांनी कळस चढवला. हार्दिक पांड्या आणि मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी 61 चेंडूत 106 धावांची भागिदारी केली. मिलरने 38 चेंडूत 68 धावांची खेळी केली..  


गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून राजस्थान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 


संजू सॅमससने 26 चेंडूत 47 धावांची खेळी केली. संजू आणि बटलर यांनी राज्थानचा डाव सावरला. दोघांनी 47 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. संजूने तीन षटकार आणि पाच चौकारांसह 47 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने 20 चेंडूत 28 धावांची खेळी केली.  


जोस बटलर 89 धावा काढून धावबाद झाला..रियान पराग चार धावा काढून धावबाद झाला. जोस बटलरच्या 89 धावांच्या बळावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या.


 यंदाच्या हंगामात तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या जोस बटलरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. बटलरने 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जोस बटलर 31 चेंडूत 30 धावांवर खेळत होता.. त्यानंतर अखेरच्या षटकात बटलरने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. जोस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान बटलरने 12 चौकार आणि दोन षटकार लगावले. 


गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला.. पण नंतर राजस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. गुजरातकडून हार्दिक पांड्या, मोहम्मद शामी, यश दयाल आणि आर साईकिशोर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. मोहम्मद शामी, यश दयाल, अल्झारी जोसेफआणि आर साईकिशोर महागडे ठरले.. या गोलंदाजांना प्रतिषटक 10 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. 


पावसामुळे खेळपट्टी संथ - 
मागील दोन दिवसांपासून कोलकात्यामध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा होता.. पावसामुळे खेळपट्टी संथ झाली होती..त्यामुळे बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नव्हता.. त्यामुळे जोस बटलरसारखा विस्फोटक फलंदाजानेही सुरुवातीला संथ फलंदाजी केली. गुजरातच्या फलंदाजांनीही एकेरी-दुहेरी धावसंख्येवर भर दिला..


संजू सॅमसनने पुन्हा नाणेफेक गमावली -
संजू सॅमसनने आज पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिकवेळा नाणेफेक गमावण्याचा नकोसा विक्रम संजूच्या नावावर जमा झालाय.