LSG vs RCB: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाची भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे. 


लखनौची दमदार कामगिरी
लखनौ सुपर जायंट्सचा यंदाचा आयपीएलमधील पहिलाच हंगाम होय. पहिल्याच हंगामात राहुलच्या नेतृत्वात लखनौने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. लखनौने चौदा सामन्यात ९ विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. राहुलने लखनौकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय  क्विंटन डिकॉक, युवा आयुष बदोनी, दीपक हुड्डा यांनीही मोलाची कामगिरी केली. फलंदाजीप्रमाणे लखनौचा संघ गोलंदाजीतही तगडा अशल्याचे दिसले. आवेश खान, मोहसीन खान या भारतीय गोलंदाजांसोबतच  जेसन होल्डर चांगली कामगिरी करत आहे. 


आरसीबीचं प्रदर्शन
आरसीबीनं सलग तिसऱ्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरसीबीचा संघा त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघानं आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु, या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीनं 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एवढेच नव्हेतर, आरसीबीच्या संघात अनेक स्टार फलंदाज असूनही ते  2017 आणि 2019 मध्ये गुणतालिकेत तळाशी होते. 


लखनौ- बंगळुरू यांच्यातील सामना कधी, कुठे पाहता येणार?
लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना आज बुधवारी, 25 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक 7 वाजता होईल.लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्याचं स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण होईल. हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रिमिंग असेल. या सामन्यातील लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटवर भेट देऊ शकतात.


हे देखील वाचा-