GT Vs RCB: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) सुरु असलेल्या आयपीएल2022 च्या 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सनं पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेटस् गमावून धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 6 विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुजरातच्या विजयात अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि डेव्हिड मिलरनं (David Miller) महत्वाची भूमिका बजावली.


सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे-


- नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


- या सामन्यात आरसीबीची सुरुवात खराब झाली. कर्णधार फाफ डू प्लेसिस बंगळुरूच्या डावातील दुसऱ्या षटकात गोल्डन डकचा शिकार ठरला.


- त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी बंगळुरूच्या संघाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेट्ससाठी दोघांनी 99 धावांची भागेदारी केली. 


- बंगळुरूकडून विराट कोहली आणि रजत पाटीदारनं अर्धशतकी खेळी केली. 


- बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून गुजरातसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं.


- बंगळुरुनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातचे सलामीवीर वृद्धीमान साहा आणि शुभमन गिलनं संघाला चांगली सुरुवात करून दिली.


- परंतु, आठव्या षटकात वानिंदु हसरंगानं वृद्धीमान साहानं रुपात गुजरातला पहिला झटका दिला. 


- त्यानंतर साई सुदर्शन आणि हार्दिक पांड्याला बाद करून बंगळुरूच्या संघानं सामन्यात कमबॅक केलं


- पण राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरनं आक्रमक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.


- गुजरातच्या संघानं सहा विकेट्स राखून हा सामना जिंकला.


हे देखील वाचा-