GT Vs PKBS, IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील मैदानावर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला आठ विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुजरातच्या संघानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 142 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं 16 व्या षटकातचं गुजरातनं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. तर, शिखर धवन (Shikhar Dhawan) पंजाबच्या विजयाच्या शिल्पकार ठरला. 


नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. गुजरातच्या डावातील तिसऱ्या षटकात पंजाबच्या संघानं शुमभन गिलच्या रुपात पहिलं यश मिळवलं. ऋषी धवनच्या अचूक थ्रोनं शुभमन गिल धाव बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन मैदानात आला. गुजरातकडून साई सुदर्शननं एकहाती झुंज दिली. त्यानं 50 चेंडूत 64 धावा केल्या. साई सुदर्शन गुजरातकडून अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी केली. परंतु, दुसऱ्या बाजूनं कोणत्याही फलंदाजाकडून त्याला साथ मिळाली नाही. गुजरातनं 20 षटकात आठ विकेट्स गमावून पंजाबसमोर 143 धावांचं लक्ष्य ठेवलं. पंजाबकडून कागिसो रबाडानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर अर्शदीप सिंह, ऋषी धवन आणि लियॉन लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 


गुजरातच्या संघान दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्याच षटकात पंजाबचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर शिखर धवननं भानुका राजपक्षेला सोबत घेऊन संघाचा डाव पुढे नेला. पण, बाराव्या षटकात लॉकी फॉर्ग्युसनच्या गोलंदाजीवर राजपक्षेनं त्याची विकेट्स गमावली. त्यानं 28 चेंडूत 40 धावांची खेळी केली. दरम्यान, शिखरनं धवन आणि लियॉम लिव्हिंगस्टोननं अखेरपर्यंत मैदानात उपस्थित राहून पंजाबच्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात शिखर धवननं 53 चेंडूत 62 धावा केल्या. तर, लिव्हिंगस्टोननं दहा चेंडूत वादळी खेळी करत 30 धावा केल्या. ज्यात तीन षटकार आणि दोन चौकरांचा समावेश होता. गुजरातकडून मोहम्मद शामी आणि लॉकी फॉर्ग्युसनला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 


हे देखील वाचा-