GT Vs PKBS, IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Dr DY Patil Sports Academy) सुरू असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्जसमोर (Gujarat Titans vs Punjab Kings) 143 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुजरातच्या संघानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शननं (Sai Sudharsan) एकहाती झुंज दिली. त्यानं 50 चेंडूत 64 धावा केल्या.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. गुजरातच्या डावातील तिसऱ्या षटकात पंजाबच्या संघानं शुमभन गिलच्या रुपात पहिलं यश मिळवलं. ऋषी धवनच्या अचूक थ्रोनं शुभमन गिल धाव बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन मैदानात आला. गुजरातकडून साई सुदर्शननं एकहाती झुंज दिली. त्यानं 50 चेंडूत 64 धावा केल्या. साई सुदर्शन गुजरातकडून अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी केली. परंतु, दुसऱ्या बाजूनं कोणत्याही फलंदाजाकडून त्याला साथ मिळाली नाही. गुजरातनं 20 षटकात आठ विकेट्स गमावून पंजाबसमोर 143 धावांचं लक्ष्य ठेवलं. पंजाबकडून कागिसो रबाडानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर अर्शदीप सिंह, ऋषी धवन आणि लियॉन लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
संघ-
गुजरात प्लेईंग इलेव्हन:
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, प्रदीप सागवान, मोहम्मद शमी.
पंजाब किंग्ज प्लेईंग इलेव्हन:
मयांक अग्रवाल (कर्णधार),शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयस्टो, जितेश शर्मा, ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा.
हे देखील वाचा-
- Gill Run out: : ऋषी धवनच्या 'डायरेक्ट हिट'चा शिकार ठरला शुभमन गिल, पाहा कसा झाला रनआउट?
- West Indies New Captain : पोलार्डच्या निवृत्तीनंतर वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार निकोलस पूरन; एकदिवसीय संघासह टी20 संघाची मिळाली जबाबदारी
- Cristiano Ronaldo: 'आय एम नॉट फिनिश' ब्रेंटफोर्डविरुद्द दमदार कामगिरीनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणाला...