IPL 2022: वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला (Sanju Samson) लहानपणापासूनच क्रिकेटर बनायचे होते. संजू सॅमसनला लहानपणापासूनच क्रिकेटर होण्याचं वेड लागलं होतं. संजूला क्रिकेटर बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी अनेक आव्हानात्मक निर्णय घेतले आहेत. एका युट्युब चॅनलशी बोलताना संजू सॅमसननं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या प्रवाशाशी संबंधित काही किस्से सांगितले आहे. तसेच त्याला क्रिकेटर बनवण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी किती मेहनत आणि अडचणींचा सामना केला, हे देखील त्यानं सांगितलं आहे.


संजू सॅमसनच्या आई-वडिलांचा धाडसी निर्णय
यूट्यूब चॅनल 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'शी बोलताना संजू सॅमसन म्हणाला की, ज्यावेळी मी सात वर्षाचा असताना माझे वडील मला नेट प्रॅक्टिससाठी फिरोजशाह कोटलाच्या मैदानात घेऊन गेले होते. दिल्लीत खूप स्पर्धा होत्या. आम्ही एक-दोन ठिकाणी ट्रायल दिल्या, पण काहीही झालं नाही. त्यानंतर माझ्या वडिलांना मला केरळकडून खेळवायचा निर्णय घेतला. महिन्याभरातच आम्ही शाळा सोडून केरळला शिफ्ट झालो. माझ्या आई वडिलांनी माझ्या भावंडांसाठी घेतलेला धाडसी निर्णय होता. 


म्हणून आम्हाला केरळमधील शाळेत लवकर प्रवेश मिळाला नाही
"त्रिवेंद्रमला पोहोचल्यानंतर एक-दोन महिने आम्हाला कोणत्याही शाळेत प्रवेश मिळाला नाही. कारण आम्ही अर्ध्यातूनच शाळा सोडली होती. अखेल काही दिवसानंतर आम्हाला एका शाळेत प्रवेश मिळाला. आमचे वडील दिल्ली पोलिसात कार्यरत होते आणि आम्ही केरळमध्ये होतो. क्रिकेटमध्ये मला काही खास कामगिरी करता येत नसल्यानं माझ्या वडिलांनी निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आणि केरळला पोहचले. केरळ मध्ये पोहचल्यानंतर माझ्या वडिलांनी मला सकाळ-संध्याकाळ सरावासाठी घेऊन जायचे. आमच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. आम्ही जेव्हा दिल्लीत खेळायला जायचो, तेव्हा आमची किट बॅग घेऊन  माझे आई-वडील बस स्टँडपर्यंत यायची ", असंही त्यानं म्हटलं आहे.


आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ कितव्या क्रमांकावर?
सध्या संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचं कर्णधारपद संभाळत आहे. यंदाच्या हंगामात संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानच्या संघानं दहा पैकी सहा सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 


हे देखील वाचा-