Mumbai Indians'new finisher : आयपीएलचा 15 वा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खराब गेला. मुंबईला लागोपाठ आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्मा, ईशान किशन, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांचा खराब फॉर्मने मुंबईला प्लेऑफमधून बाहेर काढले. तिलक वर्मा आणि टीम डेविड यंदाच्या हंगामात मुंबईची चांगली गुंतवणूक ठरले आहेत. दोघांनीही मुंबईसाठी चांगली खेळी केली. तिलक वर्माने खोऱ्याने धावा चोपल्या. तर टीम डेविड याने दोन सामन्यात जबरदस्त फिनिशिंग टच दिला. टीम डेविडचा फिनिशिंग टच पोलार्डपेक्षाही चांगला असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितलेय.
मुंबईने मागील दोन सामन्यात विजय मिळवलाय. या दोन्ही सामन्यात टीम डेविडचा फिनिशिंग टच सर्वात महत्वाचा ठरलाय. टीम डेविडने दोन्ही सामन्यात जबरदस्त फिनिशिंग टच दिला. दोन्ही विजयात टीम डेविडचा मोठा वाटा आहे. मुंबई इंडियन्सने टीम डेविडसाठी आयपील लिलावात 8.25 कोटी रुपये खर्च केले होते.
हंगामाच्या पहिल्या दोन सामन्यात मंबईने टीम डेविडला संधी दिली होती. या दोन्ही सामन्यात डेविडला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. दोन सामन्यात टेम डेविडला फक्त 13 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर पुढील सहा सामन्यात मुंबईने डेविडला वगळले होते. त्यानंतर पुढील दोन सामन्यात डेविडला संधी देण्यात आली. या दोन्ही सामन्यात फलंदाजी करताना टीम डेविडने आपला करिश्मा दाखवला.
टीम डेविडने राजस्तानविरोधात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 9 चेंडूत 20 धावांची खेळी केली अन् मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात गुजरातविरोधात वादळी खेळी केली. टीम डेविडने 21 चेंडूत 44 धावांचा पाऊस पाडला. संघ अडचणीत असताना वादळी खेळी करत टीम डेविडने धावसंख्या वाढवली. त्यासाठी टीम डेविडला सामनाविर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून पोलार्डने मुंबईसाठी फिनिशरची भूमिका पार पाडली. पण यंदाच्या हंगामात पोलार्डला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पोलार्डचा फॉर्म नाही, त्यामुळे मुंबई नव्या फिनिशरच्या शोधात होती. मुंबईला चांगला फिनिशर हवा होता. टीम डेविडने विस्फोटक खेळी करत मुंबईची चिंता मिटवली. आता मुंबईला पोलार्डपेक्षा मोठा फिनिशर मिळाला आहे.