LSG vs DC, IPL 2022: दिल्ली आणि लखौन यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना खेळला जात आहे.  नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्डेडियमवर खेळला जात असलेल्या आजच्या सामन्यात लखनौच्या संघानं मधल्या फळीचा फलंदाज मनिष पांडेला  (Manish Pandey)  ड्रॉप करण्यात आलं आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


मनिष पांडेचीकामगिरी संघाच्या चिंतेचा विषय ठरलीय. मागील सामन्यात हैदराबादविरुद्ध खेळताना मनिष पांडेनं एक षटकार आणि एक चौकार लगावत 11 धावा केल्या होत्या. याशिवाय, या हंगामात मनिषने तीन सामन्यात केवळ 22 धावा केल्या आहेत. आतापर्यंत मनिषला आपल्या खेळीचा ठसा उमटवता आलेला नाही. यावर आकाश चोप्रानं मनिष पांडेला ड्रॉप करण्यात सांगत लखौनच्या संघाला त्यांची गोलंदाजी मजबूत करण्याचा सल्ला दिला. 


"लखनौचा संघ किती वेळ मनिष पांडेसोबत राहणार? लखनौच्या संघानं यापलिकडे पाहायला हवंय. युवा फंलंदाज दीपक हुडा आणि आयुष बदोनी मनिष पांडेच्या जागेवर फलंदाजी करू शकतात. जेसन होल्डर सारख्या फलंदाजाला आठव्या आणि नवव्या क्रमांकावर पाठवणं चुकीचं आहे. एवढेच नव्हेतर, क्रुणाल पांड्याही चांगली फलंदाजी करू शकतो. लखनौच्या संघाची बॅटींग ऑर्डर मोठी आहे. कृष्णप्पा गौतम किंवा अंकित राजपूतला खेळवलं जाऊ शकतं", असं आकाश चोप्रानं आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हटलं आहे. 


आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधराव्या सामन्यात दिल्लीच्या संघानं लखनौसमोर 150 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात लखनौच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून 149 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून सलामी फलंदाज पृथ्वी शॉनं दमदार खेळी केली. त्यानं 34 चेंडूत 64 धावा ठोकल्या आहेत. लखनौकडून रवी बिश्नोईनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत. 


हे देखील वाचा-