Kevin Pietersen on Virat kohli : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणजे जागतिक क्रिकेटमधील एक सर्वात मोठं नाव. अव्वल फलंदाजाच्या यादीत विराजमान हा क्रिकेटपटू मागील काही काळापासून मात्र खास फॉर्ममध्ये नाही. 2019 पासून त्याच्या बॅटमधून एकही शतक आलेलं नाही. त्यामुळे या क्रिकेटच्या 'किंगवर' सर्वच स्तरातून टीका होत आहेत. क्रिकेट सोडता दुसरा जगाती सर्वात लोकप्रिय खेळ असणाऱ्या फुटबॉलमधील कोहलीसारखाच अव्वल आणि अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणजे पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo). या दोघांचं नाव अनेकदा आपण ऐकत असतो, विराटने त्याचा आवडता क्रिडापटू रोनाल्डो असल्याचंही सांगितलं आहे. त्यात आता इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसन (Kevin Pietersen) याने कोहली आणि रोनाल्डो यांची तुलना केली आहे.


गुजरातविरुद्ध बंगळुरु संघ थोडक्यात सामना जिंकल्यापासून हुकला. यावेळी कोहली मात्र त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतत आहे, असे वाटत होते. त्याने यावेळी अर्धशतकही ठोकलं पण नंतर तो बाद झाला. याबाबत बोलताना पीटरसनने कोहलीबाबत म्हणाला, कोहली हवं तसं योगदान संघाला देऊ शकत नाही. त्याच वेळी त्याने कोहलीची तुलना रोनाल्डोशी देखील केली. रोनाल्डो आणि कोहली आपआपल्या खेळातील मोठी नावं असून त्यांची ब्रँड व्हॅल्यूही तगडी आहे.  


कोहलीला रोनाल्डोकडे पाहावे लागेल


कोहलीबाबत बोलताना मँचेस्टर युनायटेडचा खेळाडू आणि पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोकडे कोहलीने पाहायला हवे असं पीटरसन म्हणाला. दोघेही दिग्गज असून ज्याप्रमाणे रोनाल्डो संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतो, तशीच कामगिरी विराटनेही करायला हवी असं पीटरसन म्हणाला आहे. 


हे देखील वाचा-