Ravi Shastri On Ruturaj Gaikwad : टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याच्याकडे प्रत्येक प्रकारचा शॉट असल्याचं रवी शास्त्री म्हणाले. तो ज्याप्रमाणे वेगवान गोलंदाजांना तो दमदार फलंदाजी करतो ते पाहून तो मीडियम पेसरला खेळतो आहे असंच वाटतं असंही रवी शास्त्री ऋतुराज गायकवाडची फलंदाजी पाहून म्हणाले. ऋतुराजने रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्या  (CSK vs SRH) 99 धावांची एक धमाकेदार अशी खेळी केली. तो अवघ्या एका धावेने शतकापासून दूर राहिला असला तरी त्याच्या खेळीचं सर्व स्तरातून कौतुक झालं.


सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज 18 व्या षटकात 99 धावांवर बाद झाला. पुण्याच्या एमसीए स्टेडियम (MCA Stadium, Pune) याठिकाणी पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 2 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. यावेळी सलामीवीर ऋतुराज आणि कॉन्वेने सर्वात दमदार कामगिरी केली. यावेळी ऋतुराजने 99 तर कॉन्वेने नाबाद 85 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावून धावा 189 करता आल्या.   


ऋतुराज-कॉन्वेची विक्रमी भागिदारी


राजस्थानविरुद्ध सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वेनं यांच्यात मोठी भागीदारी. दरम्यान, ऋतुराज गायकवाडचं केवळ एका धावानं शतक हुकलं. तर, डेव्हॉन कॉन्वेनं 85 धावांची आक्रमक खेळी केली. या दोन खेळाडूंच्या भागीदारीने विक्रम केला. आयपीएलमधील सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्या जोडींच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत.  ऋतुराज गायकवाडआणि डेवॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी केली. चेन्नई सुपर किंग्जसाठी एखाद्या जोडीने केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. ही भागीदारी अजून मोठी होऊ शकत होती. परंतु, ऋतुराज गायकवाड 99 धावांवर बाद झाला आणि त्यांची भागेदारी तुटली.


हे देखील वाचा-