IPL 2024 RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध आयपीएल 2024 मध्ये दुसरा विजय नोंदवला. हंगामातील 41व्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला. मॅचमध्ये बेंगळुरूच्या फलंदाजीदरम्यान एक मिस्ट्री गर्लची रिॲक्शन पाहायला मिळाली. जी आता सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
बंगळुरूच्या फलंदाजीदरम्यान आयपीएलमध्ये पदार्पण सामना खेळत असलेल्या स्वप्नील सिंगने असा षटकार मारला की मिस्ट्री गर्ल अवाक् झाली. आता या मिस्ट्री गर्लचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वप्नील सिंगने आयपीएल पदार्पणात 6 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 12 धावांची खेळी केली. स्वप्नील 19व्या षटकात फलंदाजीसाठी मैदानात आला. डावाच्या 20व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने हैदराबादच्या टी नटराजनला षटकार ठोकला. हा षटकार पाहून मिस्ट्री गर्ल चकीत झाल्याचे पाहायला मिळाले.
कोण आहे ही मिस्ट्री गर्ल? (RCB vs SRH Mystery Girl)
राशी सिंग असे या मिस्ट्री गर्लचे नाव आहे. राशी सिंग ही एक भारतीय अभिनेत्री आहे. नेटकऱ्यांनी मिस्ट्री गर्लला सर्च केल्यानंतर ही माहिती मिळाली. तेलगू सिनेमातून तिच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. राशी सिंगची ऑन-स्क्रीन उपस्थिती आणि अष्टपैलुत्व यांनी लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामुळे ती इंडस्ट्रीमध्ये एक उल्लेखनीय व्यक्ती बनली आहे.
रजत पाटीदारचे 19 चेंडूत अर्धशतक-
आरसीबीकडून रजत पाटीदारने (Rajat Patidar) अवघ्या 19 चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. 20 चेंडूंचा सामना करत त्याने 250 च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.
कोहलीचे 37 चेंडूत अर्धशतक-
या सामन्यात विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले. या काळात त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला. कोहलीने रजत पाटीदारसह तिसऱ्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या, तर फाफ डू प्लेसिससोबत पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीचे या मोसमातील हे चौथे अर्धशतक आहे. याआधी त्याने पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या:
जसप्रीत बुमराहला भारत सोडून कॅनडाला जायचे होते...; पत्नी संजनाला सांगितली भावनिक स्टोरी
Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम