MS Dhoni Talking About Virat kohli Batting : चेन्नईचा सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी याने लॉकर रुममध्ये विराट कोहलीच्या फलंदाजीचे उदाहरण दिलेय.. विराट कोहलीच्या बॅटिंग तंत्राबद्दल धोनीने चेन्नईच्या खेळाडूंना सांगितलेय. चेन्नईने मुंबईचा पराभव केल्यानंतर हा व्हिडीओ समोर आलाय. सोशल मीडिायवर धोनी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या छोट्या क्लिपमध्ये धोनी चेन्नईच्या खेळाडूंना विराट कोहलीच्या बॅटिंगकडून शिकण्याचा सल्ला देत असल्याचे दिसतेय. 


चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यानंतर आरसीबी आणि दिल्लीचा सामना झाला. आरसीबी प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले होते.. तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जातेय. विराट कोहली फलंदाजी करत असताना धोनीने चेन्नईच्या खेळाडूंना विराट कोहलीच्या तंत्राबद्दल सांगितले. व्हिडीओत स्पष्ट काही समजत नाही.. पण छोट्या व्हिडीओत धोनी विराट कोहलीच्या बॅटिंगबद्दल सांगत असल्याचे दिसतेय. 41 वर्षीय धोनी म्हणाला की, 'विराट कोहली पहिल्या चेंडूवर असा कधीच खेळत नाही. नेहमी असेच राहिलेय..' धोनी विराट कोहलीबद्दल बोलत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयारल झालाय. धोनी आपल्या सहकाऱ्यांना विराट कोहलीच्या बॅटिंग स्किलबद्दल सांगत असल्याचा दावा अनेकांनी केलाय. 






गुणतालिकेतील स्थिती काय ?


गुजरात टायटन्सचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. पण इतर संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय गरजेचाच आहे. गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरातने आतापर्यंतचा 11 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले असून संघाकडे 16 गुण आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघाकडे 13 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लखनौ संघ असून त्यांचे 11 गुण आहेत. चेन्नई आणि लखनौ यांच्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. राजस्थानचा संघ चौथ्या स्थानावर आहे.


मागील सामन्यात पराभवानंतर बंगळुरु आणि मुंबईला आयपीएल गुणतालिकेत टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. बंगळुरु (RCB) संघ पाचव्या तर मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघाकडे प्रत्येकी दहा-दहा गुण आहेत. गुजरात आणि चेन्नईचं प्लेऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित झालं आहे. असं असलं तरी सर्व संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्यासाठी संघांना आगामी सामने जिंकावे लागतील.


आणखी वाचा :


IPL 2023 Playoffs : कुणाला 4 तर कुणाला 3... प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी कोणत्या संघाची कुणासोबत लढत? 


IPL 2023 Points Table : थरारक सामन्यात हैदराबादचा विजय, सर्व संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी; पाहा पॉईंट्स टेबलची स्थिती