IPL 2023 Orange Cap and Purple Cap : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप (Orange Cap) आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. यंदाच्या आयपीएल (IPL 2023) मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, डेवॉन कॉनवे, शुभमन गिल असे अनेक खेळाडू आहेत. दरम्यान, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलने विराट कोहलीच्या पुढे गेले आहेत. यशस्वी जैस्वाल सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर तर शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर आहे.
IPL 2023 Orange Cap : ऑरेंज कॅप
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आतापर्यंतच्या हंगामात सर्वाधिक धावा केल्याने त्याच्याकडे सध्या ऑरेंज कॅप आहे. डु प्लेसिसने दहा सामन्यांमध्ये 511 धावा केल्या आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा फलंदाज यशस्वी जैस्वाल असून त्याने 11 सामन्यांत 477 धावांचा पल्ला गाठला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गुजरातचा शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर पोहोलचा आहे.
विराट कोहली कोणत्या स्थानावर?
लखनौ विरुद्धच्या सामन्यात शुभमनने 94 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर तो चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 11 सामन्यांत 469 धावा ठोकल्या आहे. यानंतर चेन्नईचा डेवॉन कॉनवे चौथ्या क्रमांकावर तर विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. कॉनवेने आतापर्यंतच्या 11 सामन्यांमध्ये 458 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने दहा सामन्यांत 419 धावा ठोकल्या आहेत.
क्र. | टॉप 5 फलंदाज | धावा |
1. | फाफ डु प्लेसिस | 511 |
2. | यशस्वी जैस्वाल | 477 |
3. | शुभमन गिल | 469 |
4. | डेवॉन कॉनवे | 458 |
5. | विराट कोहली | 419 |
IPL 2023 Purple Cap : पर्पल कॅप
यंदाच्या आयपीएल (IPL 2023) मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सध्या मोहम्मद शमी अव्वल स्थानावर आहे. सध्याच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांत एकूण 19 विकेट्स घेत मोहम्मद शमी (Mohammed Shami) पर्पल कॅपच्या (Purple Cap) शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यासोबत गुजरातचाच दुसरा गोलंदाज राशिद खानही दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानेही 19 विकेट घेतल्या आहेत. पण शमीपेक्षा त्याचा इकॉनॉमी रेट जास्त आहे. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे तिसऱ्या स्थानावर आहे. तुषारनेही 11 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर मुंबईचा पीयुष चावला असून त्याने आतापर्यंतच्या दहा सामन्यांमध्ये 17 बळी घेतले आहेत. पाचव्या क्रमांकावर राजस्थानचा युजवेंद्र चहल आहे. चहलने 11 सामन्यांमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.
क्र. | टॉप 5 गोलंदाज | विकेट |
1. | मोहम्मद शमी | 19 |
2. | राशिद खान | 19 |
3. | तुषार देशपांडे | 19 |
4. | पीयुष चावला | 17 |
5. | युजवेंद्र चहल | 17 |