Devon Conway father dies News : आयपीएल 2025 च्या 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 9 विकेट्सने पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सीएसकेचे खेळाडू एका नवीन रूपात दिसले. हे पाहून सर्वांना धक्का बसला. खरं तर, चेन्नई सुपर किंग्जचे सर्व खेळाडू दुसऱ्या डावात काळ्या पट्ट्या घालून मैदानात आले होते. त्यानंतर लोकांना एकच प्रश्न पडला की, असे काय झाले की सीएसकेच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. खरंतर, चेन्नई सुपर किंग्जचा स्टार डेव्हॉन कॉनवेच्या वडिलांचे निधन झाले. चेन्नई सुपर किंग्जने ट्विट करत ही माहिती दिली.
त्यामुळे डेव्हॉन कॉनवेला आता न्यूझीलंडला परत जावे लागू शकते. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही बातमी शेअर केली आहे. डावखुरा फलंदाज डेव्हॉन कॉनवे यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. चेन्नईने ट्विट करत लिहिले की, या कठीण काळात आम्ही त्याच्या कुटुंबासोबत उभे आहोत.
डेव्हॉन कॉनवेने संघासाठी शेवटचा सामना 11 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळला. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यापासून कॉनवे संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसलेला नाही.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात एमआयने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 177 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 26 चेंडू आणि 9 विकेट शिल्लक असताना विजय मिळवला.
हे ही वाचा -