Delhi Capitals Kits Stolen : आयपीएलच्या (IPL 2023) प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही वाद हमखास होतात, तर कधी मॅच फिक्सिंगची (IPL Match Fixing) प्रकरण समोर येतात. सलग पाच सामन्यात पराभवामुळे आधीच संकटात असलेल्या दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडूंचं सामान चोरीला गेलं आहे. यामध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नरलाही फटका बसला असून त्याच्यासह इतर खेळाडूंचं सामानंही चोरीला गेलं आहे. दिल्ली संघातील खेळाडूंच्या एकूण 16 बॅट्स चोरीला गेल्या आहेत. त्याशिवाय खेळाडूंकडील अन्य सामानही चोरट्यांनी लंपास केलं आहे. 


दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढत्याच


या चोरीमुळे सगळ्यात जास्त नुकसान यश ढुलचं झालं असून त्याच्या पाच बॅट्स चोरीला गेल्या आहेत. मिचेल मार्शच्या दोन बॅट्स चोरी झाल्या आहेत. तर फिल सॉल्ट याच्याही तीन बॅट्स गायब आहेत. त्याखेरीज ग्लव्ह्ज, बूट आणि अन्य सामानही चोरीला गेलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू बेंगळुरूहून दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांना सामान चोरीला गेलं असल्याचं समजलं. 


खेळाडूंचं सामान चोरीला, पुढील सामन्यात अडचण


दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू आजच्या सामन्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. 
खेळाडूंनी आपल्या खोलीचा ताबा घेतला. काही वेळानं त्यांचं सामान रूमवर पोहोचवण्यात आलं तेव्हा सामानातील अनेक गोष्टी गायब असल्याचं खेळाडूंना आढळलं. या चोरीमुळे खेळाडूंना धक्का बसला आहे. यश आणि फिल यांच्या रेडी टू प्ले बॅट्स गायब असल्याने त्यांना आता पुढील सामन्यात अडचण होऊ शकते.


आजच्या सामन्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का


आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. दिल्लीच्या घरच्या मैदानावरील सामन्याच्या आधीच दिल्ली संघाला हा मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना जेव्हा त्यांच्या किट बॅगमध्ये छेडछाड झाल्याचं आढळून आलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. 15 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या सामन्यानंतर खेळाडू बंगळुरूहून दिल्लीला पोहोचले. तेव्हा खेळाडूंना लक्षात आलं की त्यांचं सामान चोरीला गेलं आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, खेळाडूंच्या किट बॅगमधून पॅड, शूज, आणि ग्लोव्ह्ज यांच्यासह 16 बॅट चोरीला गेल्या आहेत.


पाहा व्हिडीओ : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचं सामान चोरीला



आज कोलकाता विरुद्ध सामना


आयपीएल 2023 च्या (IPL 2023) आजच्या डबल हेडर सामन्यातील दुसरा सामना दिल्ली आणि कोलकाता (DC vs KKR) या दोन संघांमध्ये होणार आहे. 16 व्या हंगामातील 28 वा सामना आज (19 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. दिल्ली आज पहिला विजय मिळवून खातं उघडणार का हे पाहावं लागणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


DC vs KKR Playing 11 : नितीश राणा की वॉर्नर कोण मारणार बाजी? प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबद्दल जाणून घ्या