Delhi vs Hyderabad: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शानदार गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 134 धावांवर रोखले. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक 28 धावा केल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सकडून कागिसो रबाडाने तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय एनरिक नॉर्टजे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.


तत्पूर्वी, हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नर खाते न उघडता बाद झाला. हैदराबादने डेव्हिड वॉर्नर (0), रिद्धीमान साहा (18), कर्णधार केन विल्यमसन (18) आणि मनीष पांडे (17) यांच्या रूपाने आपले चार विकेट गमावले.


यानंतर थोड्याच वेळात केदार जाधव (03) एक धाव काढल्यानंतर बाद झाला आणि त्यानंतर अक्षर पटेलने जेसन होल्डरला (10) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अब्दुल समदने डाव सांभाळत काही फटके खेळले. पण, तोही सातवा फलंदाज म्हणून बाद झाला. समदने 21 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या.


यानंतर राशिद खानने 19 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्या, तर संदीप शर्मा खाते न उघडता धावबाद झाला. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमार तीन चेंडूत एका चौकाराच्या मदतीने नाबाद राहिला.


दिल्ली कॅपिटल्सकडून कागिसो रबाडाने 37 धावांत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय एनरिक नॉर्टजेने 12 धावांत दोन आणि अक्षर पटेलने 21 धावांत दोन बळी घेतले.


हैदराबादचा गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह


सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी संध्याकाळी होणाऱ्या सामन्याबाबत शंका होती. पण, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की दोन्ही संघांमधील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेळेवर खेळला जाईल. सध्या नटराजन आणि त्याच्या संपर्कात आलेले खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांना आयसोलेट करण्याल आले आहे. वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.