DC vs LSG, IPL 2022 Marathi News : ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिट्लस आणि राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स रविवारी आमनेसामने आहेत.  मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 45 वा सामना रंगणार आहे. दिल्ली आणि लखनौ संघ विजयी लय कामय राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. मागील सामन्यात दिल्लीने कोलकात्याचा तर लखनौने पंजाबचा पराभव केला होता. हीच विजयी लय कायम राखण्याचा दोन्ही संघाच प्रयत्न असणार आहे. 


दिल्लीकडून चायनामन कुलदीप यादव कमालीचा फॉर्ममध्ये आहे. कुलदीप यादव सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीपच्या नावावर यंदा 17 विकेट आहेत. कोलकात्याविरोधात कुलदीपने एकहाती दिल्लीला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे लखनौच्या नवाबांना कुलदीप आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवणार का? हे रविवारी समजेल. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांचा अपवाद वगळता दिल्लीच्या इतर फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. कर्णधार ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रॉवमन पॉवेल यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. दिल्लीची सर्वात मोठी चिंता दुसऱ्या क्रमांकावरील फलंदाज होय... मिचेल मार्शला अद्याप मोठी खेळी करता आली नाही. 


लखनौसाठी दिलासादायक बाब म्हणजे, सलामी फलंदाज क्विंटन डिकॉक लयीत परतलाय. पंजाबविरोधात महत्वाची 46 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय केएल राहुलची तुफान फॉर्ममध्ये आहे. दीपक हुड्डा, आयुष बडोनी आणि क्रृणाल पांड्या आपले काम चोख बजावत आहेत. मार्कस स्टॉयनिसला मात्र अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. लखनौ संघाची गोलंदाजीची बाजूही मजबूत आहे. रवी बिश्नोई फिरकीची धुरा सांभाळत आहे. आवेश खान, मोहसीन खान यांच्या जोडीला जेसन होल्डर चांगली गोलंदाजी करत आहे. 


कधी, कुठे पाहणार सामना?
लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 1 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 07.30 वाजता सुरू होईल. या टी -20 सामन्याचे प्रसारण स्टार नेटवर्कवर होईल.हॉटस्टार डॉट कॉमवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील यांच्यातील सामन्याचे थेट ऑनलाईन प्रसारण तुम्ही पाहू शकता. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.