Delhi Capitals vs Kolkata Knight Riders: केकेआरचा विराट विजय, दिल्ली 106 धावांनी पराभूत
DC vs KKR IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 106 धावांनी विजय मिळवला आहे.
रिषभ पंत दिल्लीचा डाव सावरणार असं वाटत असतानाच वरुण चक्रवर्तीनं रिषभ पंत आणि अक्षर पटेलला बाद केलं. रिषभनं 55 धावा केल्या. तर, अक्षर पटेल एकही धाव करु शकला नाही.
रिषभ पंत आणि स्टब्सनं यांनी दिल्लीचा डाव सावरला. दिल्लीनं 12 व्या ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा पार केला.
अखेर दिल्लीच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. दिल्लीची मदार आता कॅप्टन रिषभ पंतवर आहे.
273 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. दिल्लीला सुरुवातीलाच चार धक्के बसले. पृथ्वी शॉ, मिशेल मार्श आणि अभिषेक पोरेल, डेव्हिड वॉर्नर हे चार जण लवकर बाद झाले.
कोलकाताच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 272 धावा केल्या आहेत. रिषभची टीम ही धावसंख्या पार करणार का हे पाहावं लागणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सला चौथा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यर 18 धावा करुन बाद झाला.
कोलकाता नाईट रायडर्सनं 16 व्या ओव्हरला 200 धावांचा टप्पा पार केला आहे. नरेन आणि रघुवंशी बाद झाल्यानंतर आंद्रे रस्सेलनं फटकेबाजी केली.
कोलकाता नाईट रायडर्सनं 16 व्या ओव्हरला 200 धावांचा टप्पा पार केला आहे. नरेन आणि रघुवंशी बाद झाल्यानंतर आंद्रे रस्सेलनं फटकेबाजी केली.
KKR vs DC : 15 व्या ओव्हरपर्यंत केकेआरच्या 3 बाद 195 धावा झाल्या आहेत. नरेन रघुवशींची जोडी बाद झाल्यानंतर केकेआरच्या धावसंख्येचा वेग मंदावला आहे.
KKR vs DC : 15 व्या ओव्हरपर्यंत केकेआरच्या 3 बाद 195 धावा झाल्या आहेत. नरेन रघुवशींची जोडी बाद झाल्यानंतर केकेआरच्या धावसंख्येचा वेग मंदावला आहे.
KKR vs DC : 15 व्या ओव्हरपर्यंत केकेआरच्या 3 बाद 195 धावा झाल्या आहेत. नरेन रघुवशींची जोडी बाद झाल्यानंतर केकेआरच्या धावसंख्येचा वेग मंदावला आहे.
KKR vs DC : 15 व्या ओव्हरपर्यंत केकेआरच्या 3 बाद 195 धावा झाल्या आहेत. नरेन रघुवशींची जोडी बाद झाल्यानंतर केकेआरच्या धावसंख्येचा वेग मंदावला आहे.
केकेआरला तिसरा धक्का बसला असून रघुवंशी 54 धावांवर बाद झाला आहे.
केकेआरच्या सुनील नरेन आणि रघुवंशी यांनी आक्रमक फलंदाजी वादळी सुरुवात 11 व्या ओव्हरमध्ये 150 धावांपर्यंत मजल मारली.
KKR vs DC : केकेआरनं वेग पकडला असून 9 ओव्हरमध्ये 126 धावा केल्या आहेत
KKR vs DC : केकेआरच्या पहिल्या सहा ओव्हरमध्ये 1 बाद 88 धावा झाल्या आहेत. सुनील नरेन यानं अर्धशतकी खेळी करत केकेआरचा डाव सावरला.
केकेआरनं पहिल्या चार ओव्हरमध्ये बिनबाद 58 धावा केल्या आहेत.
KKR vs DC : कोलकाताच्या दुसऱ्या ओव्हरअखेर बिनबाद 17 धावा
KKR vs DC Score : कोलकातानं सावध सुरुवात केली असून पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा केल्या आहेत.
फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि अंगक्रिश रघुवंशी
ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ॲनरिक नॉर्टजे, सुमित कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद
DC vs KKR : कोलकातानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यरनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
DC vs KKR Toss Update : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅचसाठी थोड्याच वेळात टॉस होणार आहे. सात वाजता टॉस होईल.
दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन मिशेल मार्श टी-20 क्रिकेटमध्ये 200 सिक्स मारण्याचा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा विक्रम करण्यासाठी त्याला पाच षटकारांची गरज आहे.
दिल्ली आणि केकेआर यांच्यातील लढतीसाठी विशाखापट्टणम सज्ज
आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स 32 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 16 सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सला 15 सामन्यांत यश मिळाले आहे. याशिवाय 1 सामन्याचा निकाल लागू शकला नाही. दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा वरचष्मा दिसून येत आहे. विशेषत: केकेआरचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, ते पाहता ऋषभ पंतसाठी आव्हान सोपे नसेल.
विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर फलंदाज सहज धावा करतात. या खेळपट्टीवर मोठे फटके खेळताना फलंदाजांना कोणतीही अडचण येत नाही. पण गोलंदाजांच्या अडचणी मात्र वाढतात. दोन्ही संघांचे गोलंदाज कठीण आव्हानाला कसे सामोरे जातात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि अंगक्रिश रघुवंशी.
ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ॲनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
पार्श्वभूमी
DC vs KKR IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगणार आहे. विशाखापट्टणम मैदानावर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -