David Miller and Rahul Tewatia : आयपीएलच्या 15 व्या (IPL 15) व्या हंगामात गुजरात संघाने दमदार प्रदर्शन केले आहे. आतापर्यंत गुजरातपुढे प्रतिस्पर्धी संघाला विजय मिळवता आला नाही. गुजरातने नऊ सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. सांघिक कामगिरीच्या जोरावर गुजरात संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. यामध्ये राहुल तेवातिया आणि डेविड मिलर या जोडीचा मोठा वाटा आहे. गुजरातसाठी ही जोडी संकटमोचक ठरली आहे. या जोडीने अनेकदा अखेरच्या षटकात सामना फिरवला आहे. राहुल तेवातिया आणि डेविड मिलर यांनी गुजरातसाठी फिनिशरची भूमिका बजावली.  


RCB च्या विराधोता विजय -
गुजरातने आरसीबीचा पराभव केला. गुजरातच्या विजयात सर्वात मोठं योगदान डेविड मिलर आणि राहुल तेवतिया यांचे आहे. एक क्षण असा होता की गुजरात चार बाद  96 धावांवर संघर्ष करत होता.  गुजरातला विजयासाठी 42 चेंडूत 75 धावांची गरज होती. त्यानंतर राहुल तेवातिया आणि डेविड मिलर यांनी कमाल केली आहे. पाचव्या विकेटसाठी या जोडीने 40 चेंडूत नाबाद 79 धावांची भागिदारी केली. या जोडीच्या बळावर गुजरातने आठवा विजय साकार केला.  


संकटमोचक जोडी -
राहुल तेवातिया आणि डेविड मिलर गुजरातसाठी संकटमोचक ठरल्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी असा पराक्रम केलाय. लखनौ सुपर जायंट्सविरोधात पाचव्या विकेटसाठी  34 चेंडूत नाबाद 60 धावांची भागिदारी केली होती.  त्याशिवाय चेन्नईविरोधात 28 चेंडूत 39 धावा जोडल्या होत्या. पंजाबविरोधात  5 चेंडूत 18 धावा करत विजय मिळवला होता.  गुजरातने धावांचा पाठलाग करताना चौथ्यांदा विजय मिळवला.  


यंदाच्या हंगामात डेविड मिलरने नऊ सामन्यात   276 धावा चोपल्या आहेत. तर राहुल तेवातियाने  179 धावा केल्या आहेत. दोघांचा स्ट्राइक रेट 150 पेक्षा जास्त आहे.