CSK vs KKR LIVE Score: चेन्नई आणि कोलकाता यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

CSK vs KKR IPL 2023 LIVE Score: चेन्नईचा संघ 12 सामन्यांमध्ये 15 गुणांसह प्लेऑफमध्ये जाण्याच्या तयारी आहे. तर दुसरीकडे केकेआर केवळ 10 गुणांसह उर्वरित दोन सामने जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 14 May 2023 11:15 PM
कोलकात्याचा रोमांचक विजय

कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्याने चेन्नईचा पराभव केलाय. चेन्नईने दिलेले १४५ धावांचे आव्हान कोलकात्याने सहा विकेट आणि नऊ चेंडू राखून सहज पार केले. चेन्नईकडून दीपक चाहर याने तीन विकेट घेतल्या.  या विजयासह कोलकात्याचे प्लेऑफमधील आव्हान जिवंत राहिलेय. तर चेन्नईचे आव्हान अधीक खडतर झालेय. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना जिंकणे अनिवार्य झालेय.. चेन्नईचा अखेरचा सामना दिल्लीसोबत आहे.

कोलकात्याचा चार विकेटने विजय

कोलकात्याचा चार विकेटने विजय... चेन्नईचा पराभव

कोलकात्याला चौथा धक्का

अर्धशतकानंतर रिंकू सिंह बाद झालाय..कोलकात्याला चौथा धक्का बसला

नीतीश राणाचे दमदार अर्धशतक

नीतीश राणाचे दमदार अर्धशतक... ३८ चेंडूत झळकावले अर्धशतक

रिंकू सिंहचे दमदार अर्धशतक

रिंकू सिंह याने ३९ चेंडूत अर्धशतक झळकावले.. चेन्नईविरोधात दुसरे अर्धशतक झळकावले..

राणा-रिंकूची अर्धशतकी भागिदारी

राणा-रिंकूची अर्धशतकी भागिदारी... कोलकात्याचा डाव सावरला

दीपकचा भेदक मारा

 


दीपक चहर याने भेदक मारा केला. चहरने तीन षटकात तीन फलंदाजांना बाद केलेय. दीपक चहर याने जेसन रॉय, गुरबाज आणि वेंकटेश अय्यर यांना तंबूत पाठवले.

कोलकात्याला तिसरा धक्का

जेसन रॉय बाद झालाय... दीपक चहरने १२ धावांवर घेतली विकेट

कोलकात्याला दुसरा धक्का

वेंकटेश अय्यर ९ धावांवर बाद झालाय.. कोलकात्याला दुसरा धक्का... जाडेजाने घेतला जबरदस्त झेल

राजस्थानला पहिला धक्का

दीपक चहरने गुरबाजला केले बाद.. तुषार देशपांडेने घेतला जबरदस्त झेल

शिवम दबे आणि रविंद्र जाडेजा यांनी चेन्नईचा डाव सावरला

शिवम दबे आणि रविंद्र जाडेजा यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. दोघांनी चेन्नईचा डाव सावरला. सुरुवातीला संयमी फलंदाजी करत विकेट पडू दिली नाही.. त्यानंतर दोघांनी आक्रमक फलंदाजी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. रविंद्र जाडेजा आणि शिवम दुबे यांनी ६८ धावांची भागिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागिदारी झाली. रविंद्र जाडेजा याने २४ चेंडूत २० धावांची भागिदारी केली. या खेळीत जाडेजाने एक षटकार लगावला. शिवम दुबे ४८ धावांवर नाबाद राहिला.  दुबेने ३४ चेंडूत ४८ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. एमएस धोनी दोन धावांवर नाबाद राहिला.




 


फिरकीच्या जाळ्यात अडकला चेन्नईचा संघ

कर्णधार एमएस धोनीने चेपॉक मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी संयमी सुरुवात केली. पण चेन्नईची फलंदाजी फिरकीपुढे ढेपाळली. २१ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर लागोपाठ विकेट पडत गेल्या. ठरावीक अंतराने कोलकात्याने चेन्नईच्या फलंदाजांना बाद केले. सुरुवातीपासून एकही मोठी भागिदारी करु दिली नाही. ऋतुराज गायकवाड १७ धावांवर बाद झाला. ऋतुराजने १३ चेंडूत दोन चौकारासह १७ धावांची खेळी केली. ऋतुराज बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे याने कॉनवेच्या साथीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे यालाही वरुण चक्रवर्ती याने तंबूत पाठवले.  अजिंक्य रहाणे याने ११ चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १६ धावांची खेळी केली. 


अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर कॉनवेही लगेच तंबूत परतला. कॉनवे याने २८ चेंडूत तीन चौकारासह ३० धावांची खेळी केली. कॉनवे बाद झाल्यानंतर चेन्नईने लागोपाठ विकेट फेकल्या. अंबाती रायडू चार धावांवर बाद झाला. मोईन अली एक धावांवर बाद झाला. लागोपाठ विकेट पडल्यामुळे चेन्नईचा डाव ढेपाळला होता. ११ षटकात ७२ धावांच्या मोबदल्यात अर्धा संघ तंबूत परतला होता. अडचीत सापडेल्या चेन्नईसाठी शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा धावून आले. 

कोलकात्यासमोर 145 धावांचे माफक आव्हान

CSK vs KKR, IPL 2023 : शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा यांच्या अर्धशतकी भागिदारीच्या जोरावर चेन्नईने 144 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून चेन्नईच्या फलंदाजांवर अंकूश ठेवला. शिवम दुबे याने नाबाद 48 धावांची योगदान दिले. तर कॉनवे याने ३० धावांची छोटेखानी खेळी केली. कोलकात्याला विजयासाठी 145 धावांचे माफक आव्हान आहे.

चेन्नईची १४४ धावांपर्यंत मजल

चेन्नईची १४४ धावांपर्यंत मजल

शिवम दुबेची एकाकी झुंज

शिवम दबे आणि रविंद्र जाडेजा यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. दोघांनी चेन्नईचा डाव सावरला. सुरुवातीला संयमी फलंदाजी करत विकेट पडू दिली नाही.. त्यानंतर दोघांनी आक्रमक फलंदाजी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. रविंद्र जाडेजा आणि शिवम दुबे यांनी ६८ धावांची भागिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागिदारी झाली. रविंद्र जाडेजा याने २४ चेंडूत २० धावांची भागिदारी केली. या खेळीत जाडेजाने एक षटकार लगावला. शिवम दुबे ४८ धावांवर नाबाद राहिला.  दुबेने ३४ चेंडूत ४८ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला.

चेन्नईला सहावा धक्का

रविंद्र जाडेजा बाद झालाय...चेन्नईला सहावा धक्का

सुनील नारायणचा भेदक मारा - 

सुनील नारायण याने आज भेदक मारा केला. नारायण याने चार षटकात अवघ्या १५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीनेही दोन विकेट घेतल्या. पण चार षटकात त्याने ३६ धावा खर्च केल्या. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण चेन्नईच्या डावाला सुरुंग लागला. वरुण चक्रवर्तीने फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणे यांना तंबूत पाठले. तर नारायण याने मोईन अली आणि अंबाती रायडूला बाद केले. 

घरच्या मैदानावर चेन्नईची फलंदाजी ढेपाळली - 

 


ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी संयमी सुरुवात केली. पण फिरकीपुढे चेन्नईची फंलदाजी ढेपाळली. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी आघाडीच्या फलंदाजांना तंबूत पाठवले.  ऋतुराज गायकवाड १७, कॉनवे ३०, अजिंक्य रहाणे १६, अंबाती रायडू ४ आणि मोईन अळी एक धावांवर बाद झाले.

चेन्नईचा अर्धा संघ तंबूत

चांगल्या सुरुवातीनंतर चेन्नईचा डाव ढेपळला... दुबे आणि जडेजा मैदानावर आहेत.. जाडेजा सहा तर दुबे २३ धावांवर खेळत आहे... चेन्नई पाच बाद ९८ धावा

चेन्नईला दुसरा धक्का

अजिंक्य रहाणेच्या रुपाने चेन्नईला दुसरा धक्का बसलाय... वरुण चक्रवर्तीने राहाणेला १६ धावांवर बाद केलेय

रहाणे - कॉने यांची संयमी फलंदाजीरहाणे- कॉनवे यांची संयमी फलंदाजी

रहाणे- कॉनवे यांची संयमी फलंदाजी सुरु आहे. चेन्नई  एक बाद ६१ धावा केल्या आहेत..

अजिंक्य रहाणे-कॉनवेची फटकेबाजी

अजिंक्य रहाणे-कॉनवेची फटकेबाजी.. चेन्नई पाच षटकानंतर एक बाद ४८ धावा

चेन्नईला पहिला धक्का

ऋतुराजच्या रुपाने चेन्नईला पहिला धक्का बसलाय.. 

चेन्नईला पहिला धक्का

ऋतुराजच्या रुपाने चेन्नईला पहिला धक्का बसलाय.. 

कोलकात्याच्या संघात एक बदल

कोलकात्याच्या संघात अनमोलप्रीतच्या जागी वैभव अरोराला स्थान देण्यात आलेय.

कोलकात्यालाही करायची होती फलंदाजी

कोलकात्यालाही प्रथम फलंदाजी करायची होती.. नीतीश राणा याने नाणेफेकीनंतर सांगितली मन की बात

चेन्नईच्या संघात कोणताही बदल नाही

चेन्नईच्या संघात कोणताही बदल नाही... मागील सामन्यातील विजयी संघ धोनीने कायम ठेवलाय.

चेन्नईने नाणेफेक जिंकली

नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय

पार्श्वभूमी

CSK vs KKR IPL 2023 LIVE Score:  आज म्हणजेच 14 मे, रविवारी डबल हेडर सामने खेळले जातील. आजच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे संघ आमनेसामने असतील. या दोघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. या दोघांमधील या स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. यापूर्वी झालेला सामना चेन्नईने जिंकला होता.


चेन्नईचा संघ 12 सामन्यांमध्ये 15 गुणांसह प्लेऑफमध्ये जाण्याच्या तयारी आहे. तर दुसरीकडे केकेआर केवळ 10 गुणांसह उर्वरित दोन सामने जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी केकेआरला इतर संघांच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. 


चेन्नई विरुद्ध कोलकाता हेड टू हेड 


आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ 27 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये चेन्नईनं 18 आणि केकेआरनं फक्त 9 जिंकले आहेत. तसेच, या दोघांमधील आजचा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. येथे दोन्ही संघ 9 वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये चेन्नईनं 7 आणि कोलकातानं फक्त 2 सामने जिंकले आहेत.


चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे संभाव्य संघ : 


चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ 


एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), आकाश सिंह, मोइन अली, भगत वर्मा, दीपक चाहर, डेवोन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हँगरगेकर, रवींद्र जाडेजा, सिसंडा मगाला, अजय मंडल, मथीशा पथिराना , ड्वेन प्रीटोरियस, अजिंक्य रहाणे, शॅक रशीद, अंबाती रायडू, मिचेल सेंटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, बेन स्टोक्स, महेश तीक्ष्णा









नीतीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंह, एन जगदीसन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेविड वीज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंह, आर्या देसाई आणि जॉनसन चार्ल्स


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.