एक्स्प्लोर

CSK vs MI, IPL 2022 : डॅनिअल सॅम्स-तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार, चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव

CSK vs MI, IPL 2022 :डॅनिअल सॅम्सच्या भेदक माऱ्यानंतर तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला.

CSK vs MI, IPL 2022 : डॅनिअल सॅम्सच्या भेदक माऱ्यानंतर तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा विजय होय.. तर चेन्नईचा आठवा पराभव झालाय. या पराभवासह चेन्नईचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेय. तिलक वर्माच्या 34 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने चेन्नईवर पाच गड्यांनी विजय मिळवलाय. चेन्नईने दिलेल्या 98 धावांच्या आव्हानाचा मुंबईने यशस्वी पाठलाग केला. मुंबईने 14.5 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. डॅनिअल सॅम्स आणि तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार झाले. 

चेन्नईने दिलेल्या मापक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात ही खराब झाली. मुंबईचे सलामी फलंदाज झटपट माघारी गेले. चेन्नईप्रमाणे मुंबईच्या फलंदाजांची दैणा झाली. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. ईशान किशन 6, रोहित शर्मा 18, डॅनिअल सॅम्स 1, पदार्पण करणारा स्टब्स 0 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. एकाबाजूला विकेट पडत असताना तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरला. तिलक वर्माने एकाकी झुंज देत मुंबईला तिसरा विजय मिळवून दिला. तिलक वर्माने नाबाद 34 धावांची खेळी केली. टीम डेविडने 16 धावांची छोटेखानी मॅचविनिंग खेळी केली. दोन्ही डावात मिळून फक्त 5 षटकार लगावले गेले. यामध्ये चेन्नईने तीन तर मुंबईने दोन षटकार मारलेत. 

चेन्नईकडून मुकेश चौधरी आणि समजीत सिंह यांनी पहिल्या 8 षटकात भेदक मारा केला. या दोघांच्या गोलंदाजीपुढे मुंबईचे फलंदाज हतबल झाले होते. मुकेश चौधरीने तीन विकेट घेतल्या. तर समरजीत सिंहला एक विकेट मिळाली. मोईन अलीनेही एक विकेट घेतली. 

चेन्नईची दाणादाण -
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. मुंबईच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईची फलंदाजी कोलमडली. चेन्नईच्या संघाने पावरप्लेमध्ये 30 धावांच्या आत 5 गडी गमावले होते. धोनीच्या एकाकी खेळीच्या बळावर चेन्नई 97 धावांपर्यंत पोहचली. चेन्नईच्या संघाला 20 षटके फलंदाजाही करता आली नाही. डॅनिअल सॅम्सने सुरुवातील चेन्नईला तीन धक्के दिले.. त्यानंतर बुमराह आणि रायली मॅरिडेथ यांनी विकेट घेत अडचणी टाकले.. चेन्नईची फलंदाजी कोसळत असताना त्यात कार्तिकेये यानेही भेदक मारा करत चेन्नईची अवस्था आणखी वाईट केली. 
 
मुंबईचा भेदक मारा -
 मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना अक्षरश: सळो की पळो केलं. त्यामुळे चेन्नईचा संघ केवळ 97 धावा करु शकला आहे.  मुंबईकडून सर्व सर्वच गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. पण डॅनियल सॅम्सने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट्स नावे केल्या आहेत. तर रिले मेरिडेथ आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले आहेत. रमनदीप यानेही एक षटक टाकत 5 धावा देत एकच विकेट घेतली आहे. बुमराहनेही एक विकेट घेतली. 

धोनीने दिली अखेरपर्यंत लढत 
चेन्नईचे सर्वच खेळाडू एकामागे एक तंबूत परतत होते. कॉन्वे, मोईन अली आणि महेश तीक्षणा तर शून्यावर बाद झाले. इतरही खेळाडू खास कामगिरी करु शकले नाहीत. पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मात्र एकहाती अखेरपर्यंत झुंज देत संघाला किमान 97 धावांपर्यंत पोहोचवलं. धोनीने 33 चेंडूत नाबाद 36 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. धोनीने 4 चौकार आणि 2 षटकार यावेळी ठोकले. धोनीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मैदानावर स्थिरावता आले नाही.  अंबाती रायडू 10, शिवम दुबे 10 आणि ब्राव्हो 12 यांनी मुंबईच्या गोलंदाजांविरोधात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. ऋतुराज गायकवाडने सात धावांची खेळी केली. 

महत्त्वाच्या बातम्या

Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget