Wasim jaffer IPL 2022 Playoffs Prediction: आयपीएलचा पंधरावा हंगाम आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आयपीएलमध्ये सर्वात मजबूत संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. पहिल्यांदाच आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं दमदार कामगिरीच्या जोरावर प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. प्लेऑफच्या उर्वरित तीन स्थानांसाठी सात संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनं (Wasim jaffer) प्लेऑफमधील उर्वरित तीन संघांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.


वसीम जाफर काय म्हणाला?
एका स्पोर्ट्स कार्यक्रमात बोलताना वसीम जाफर म्हणला की,  गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्ससह राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र ठरेल. तर, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चौथ्या स्थानासाठी लढत होईल. आरसीबी प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नसल्याचं त्यानं म्हटलंय.  "गुजरात टायटन्सनंतर लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. राजस्थानच्या संघाला त्यांचे उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्ही सामन्यात त्यांचा पराभव होणं, खूप निराशाजनक ठरेल. पण मला असं वाटत नाही. राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरतील. तर,पंजाब आणि दिल्ली यांच्यात चौथ्या स्थानास्थाठी लढत होईल. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल, असं वाटत नाही." 


आरसीबीचा पुढील सामना गुजरातशी
दरम्यान, शुक्रवारी खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 61 व्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीला 54 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळं पंजाबच्या संघाच्या खात्यात आणखी दोन गुण जमा झाले आहेत. तर, पराभवामुळं आरसीबीचा रनरेट घसरला आहे. आरसीबीचा पुढील सामना या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात बंगळुरूच्या संघाला मोठ्या रनरेटनं जिंकावं लागणार आहे. 


हे देखील वाचा-