Andre Russell Vs Bhuvneshwar Kumar: आयपीएल 2022 चा 61 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. कोलकाता सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर असून त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. तर, आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे. अजूनही हैदराबादच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. यासाठी, हैदराबादला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणं गरजेचं आहे. कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात आंद्रे रसेल आणि भुवनेश्वर कुमार यांच्यात रंजक स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


आंद्रे रसल विरुद्ध भुवनेश्वर कुमार
दरम्यान, आंद्रे रसल आणि भुवनेश्वर कुमार यांची एकमेकांविरुद्ध कामगिरी पाहिल्यास आंद्र रसल भुवनेश्वरवर भारी पडलाय. भुवनेश्वर कुमारविरुद्ध रसेलनं 243 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली आहे. त्यानं भुवनेश्वरच्या 21 चेंडूचा सामना करत 51 धावा केल्या आहेत. तर, भुवनेश्वर कुमारला एकदाच आंद्र रसलला आऊट करता आलं आहे. कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील या सामन्यात पुन्हा एकदा हे दोन्ही खेळाडू आमने- सामने येणार आहेत. अशा स्थितीत दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. 


आयपीएल 2020 मधील दोघांची कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये  रसेलनं आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 281 धावा केल्या आहेत. या हंगामात रसेलची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 70 आहे. यंदाच्या हंगामात त्यानं 28 षटकार आणि 15 चौकार मारले आहेत. रसेलनं गोलंदाजीतही कमाल दाखवत 14 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे भुवनेश्वरनं या हंगामात खेळलेल्या 11 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 22 धावांत 3 विकेट्स घेणं ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे.


हे देखील वाचा-