KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात (Knight Riders vs Sunrisers Hyderabad) आयपीएल 2022 चा 61 सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या आशा जिंवत ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.  यंदाच्या हंगामात कोलकात्याच्या संघानं 12 पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, सात सामने गमावले आहेत. दुसरीकडं हैदाबादच्या संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत आणि सहा सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे. तर, कोलकात्याचा संघ आठव्या स्थानावर आहे. 


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकात्याच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर कोलकात्याला सलग 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं. कोलकात्यानं मुंबईविरुद्ध त्यांच्या अखेरचा सामना जिंकला आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात कोलकात्यानं 52 धावांनी विजय मिळवला. तरी आज हैदराबादविरुद्ध सामन्यात कोलकात्याच्या संघात बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुंबईविरुद्ध सामन्यात कोलकात्याच्या संघात तब्बल पाच बदल करण्यात आले होते. या सामन्यात सॅम बिलिंग्स किंवा शेल्डन जॅक्सनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जॅक्सन खेळला होता. 


पीच रिपोर्ट
कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या मैदानावरील आकडेवारीवर नजर टाकल्यास मागील 12 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जास्त विजय मिळवला आहे. या मैदानावर हैदराबादनं ५ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. यामुळं आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. 


कोलकाता नाईट रायडर्स:
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन/सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), उमेश यादव, टिम साऊदी, वरुण चक्रवर्ती.


सनरायझर्स हैदराबाद: 
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, फझलहक फारुकी, उमरान मलिक. 



हे देखील वाचा-