IPL 2023 CSK vs LSG : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आज डबल हेडर सामने खेळवले जाणार आहे. यातील पहिला सामन्यात चेन्नई (CSK) आणि लखनौ (LSG) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. मागील सामन्यात धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई (Chennai Super Kings) संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौ (Lucknow Super Giants) संघानेही आरसीबीविरुद्धचा शेवटचा सामना गमावला आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात केएल राहुलच्या खेळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या मागील सामन्यादरम्यान केएल राहुलला दुखापत झाली होती. केएल राहुलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे केएल राहुल खेळणार की त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूची एंट्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


केएल राहुलच्या दुखापतीबाबत सस्पेंस कायम


मागील सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे केएल राहुलला झालेल्या दुखापतीमुळे तो चेन्नईविरोधातील आजच्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, अद्याप संघाकडून केएल राहुलच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. केएल राहुल आजच्या सामन्याला अनुपस्थितीत राहिल्यास कृणाल पांड्याकडे संघाची धुरा असू शकते. त्यामुळे लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. लखनौ संघ दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू क्विंटन डी कॉकला संधी देऊ शकते. डी कॉकने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. गेल्या मोसमात त्याने 508 धावा केल्या होत्या. 


चेन्नई संघात कोणता बदल?


चेन्नई संघाने गेल्या काही सामन्यांपासून प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे या सामन्यातही चेन्नई संघात काही बदल करणार नाही, अशी शक्यता आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेली नाही. दरम्यान, चेन्नईचे फलंदाज आणि गोलंदाज दिवसेंदिवस चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघ गुणतालिकेतही टॉप 4 मध्ये आहे.


संभाव्य प्लेइंग इलेव्हन 


लखनऊ सुपर जायंट्स : 


क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पांड्या (कर्णधार) , निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, आवेश खान, अमित मिश्रा.


चेन्नई सुपर किंग्स : 


ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CSK vs LSG Match Preview : चेन्नई विरुद्ध लखनौ लढत? पाहा हेड टू हेड आकडेवारीमध्ये कोण वरचढ? पाहा...