IPL 2023 MI vs PBKS Match Prediction : इंडियन प्रीमियर लीगच्या 46 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) दोन संघ आमने-सामने येणार आहेत. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांना मागील सामन्यात विजय मिळवला आहे. मागील सामन्यात पंजाबनं चेन्नईचा चार विकेटने पराभव केला. तर, मुंबईनं राजस्थानवर विजय मिळवला.


IPL 2023 MI vs PBKS : मुंबई आणि पंजाब आमने-सामने


मुंबईनं यंदाच्या हंगामातील विजयी सुरुवात उशीरा केली असली, तरी त्यानंतर संघ चांगल्या स्थितीत दिसत आहे. पंजाबने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. दुसरीकडे मुंबई संघाने आतापर्यंत आठ पैकी चार सामन्यांत विजय मिळवला, तर चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.


MI vs PBKS Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघात आतापर्यंत 30 सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही संघांची स्थिती समान आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघांनी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 200 आहे.




IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आज, 03 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना लखनौमधील इकाना स्टेडिअमवर (Ekana Sport City Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.




IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : कोहलीची माफी मागण्यास नवीन-उल-हकचा नकार? कर्णधार केएल राहुलला टाळलं; नक्की चूक कुणाची?