IPL 2023 CSK vs LSG Playing 11 : आयपीएल 2023 चा 45 व्या सामन्यात आज लखनौच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. यंदाच्या मोसमातील 20 व्या सामन्यात या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळाली होती. चेन्नईच्या घरच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर लखनौला चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. चेन्नईने हा सामना 12 धावांनी जिंकला होता. या चेन्नईचा यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता लखनौ संघ सज्ज झाला आहे. शेवटच्या सामन्यात पंजाबने चेन्नईचा तर बंगळुरुने लखनौचा पराभव केला आहे.


धोनी विरुद्ध केएल राहुल


आज लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात महेंद्र सिंह धोनी आणि केएल राहुल आमने-सामने असतील. लखनौ संघाने आतापर्यंत नऊ पैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं आहे. मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या 127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरल्यानंतर लखनौ पराभवानंतर आज या सामन्यात उतरणार आहे. 


Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?


भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम (Ekana Stadium) ची खेळपट्टी टी20 च्या दृष्टीने येथील खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.


LSG vs CSK Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11


CSK Probable Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स


ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार, विकेटकीपर), तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, महिशा तीक्ष्णा.


LSG Probable Playing 11 : लखनौ सुपर जायंट्स 


केएल राहुल (कर्णधार), एमपी स्टॉइनिस, यश ठाकूर, काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौंथम, निकोलस पूरन (विकेटकीपर), रवी बिश्नोई, अमित मिश्रा, नवीन-उल-हक.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CSK vs LSG Match Preview : चेन्नई विरुद्ध लखनौ लढत? पाहा हेड टू हेड आकडेवारीमध्ये कोण वरचढ? पाहा...