CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्स भिडणार
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे.
लखनौनं चेन्नईचा आठ विकेटनं केला पराभव
रविंद्र जाडेजानं केएल राहुलचा घेतला शानदार झेल.. आयपीएलमधील सर्वोत्तम झेल... केएल राहुल 82 धावांवर बाद
केएल राहुल आणि क्विंटनच्या वादळी फलंदाजीमुळे लखनौचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. लखनौला विजयासाठी 31 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. लखनौच्या हातात9 विकेट आहेत. क्विंटन डिकॉक 54 धावा काढून बाद... केएल राहुल73 धावांवर खेळत आहे.
राहुल अन् डिकॉकनं चेन्नईची फलंदाजी धुतली. 5.2 षटकातच अर्धशतक पूर्ण
क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलची शानदार सुरुवात.. लखनौ बिनबाद 29 धावा
LSG vs CSK, IPL 2024 : रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक आणि धोनीच्या (MS Dhoni) फिनिशिंगच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 176 धावांचा डोंगर उभारला. रवींद्र जाडेजानं (Ravindra Jadeja) मोक्याच्या क्षणी 57 धावांची खेळी केली. तर धोनीनं 9 चेंडूमध्ये 28 धावा चोपल्या. लखनौकडून कृणाल पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. क्रृणाल पांड्यानं 3 षटकात 16 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मोहसीन खान, यश ठाकूर, रवि बिश्नोई आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या. लखनौला विजयासाठी 20 षटकात 177 धावांचे आव्हान आहे.
मोईन अली यानं 19 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी केली. रवि बिश्नोईला मोठा फटका माऱण्याच्या नादात मोईन अली बाद झाला. चेन्नई सहा बाद 141 धावा
चेन्नईचा संघ अडचणीत असताना जाडेजाने शानदार अर्धशतक ठोकलं. जाडेजानं 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
समिर रिझवी तंबूत.. चेन्नईचा पाचवा भिडू तंबूत
चेन्नईची आघाडीची फळी ढेपाळली आहे. अजिंक्य रहाणे 36, रचिन रविंद्र 0, ऋतुराज गायकवाड 17 आणि शिवम दुबे 3 धावांवर बाद... 11.3 षटकानंतर चेन्नई 4 बाद 87 धावा
ऋतुराज गायकवाडच्या रुपाने चेन्नईला दुसरा धक्का बसलाय. यश ठाकूर यानं गायकवाडला पाठवलं तंबूत
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, मैट हेनरी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकुर
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोइन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पथिराना
मोहसीन खान यानं रचिन रवींद्रचा त्रिफाळा उडवला. चेन्नईला पहिला धक्का बसला.. कर्णधार गायकवाड आणि रहाणे मैदानावर
लखनौचा कर्णधार केएल राहुल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
चेन्नई आणि लखनौ आयपीएलच्या इतिहासाता आतापर्यंत तीनवेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये चेन्नईने 1, तर लखनौने 1 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला.
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (w/c), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, शमर जोसेफ, यश ठाकूर
रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड(c), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी(w), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (w/c), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, शमर जोसेफ, यश ठाकूर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, अर्शद खान, कृष्णप्पा गौथम, अमित मिश्रा, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, मॅट हेन्री, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, युद्धवीर सिंग चरक, मयंक यादव, अर्शीन कुलकर्णी
रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड(c), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी(w), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, एन. मोईन अली, मिचेल सँटनर, शेख रशीद, अरावेली अवनीश, महेश टेकशाना, आरएस हंगरगेकर, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, अजय जाधव मंडल, रिचर्ड ग्लीसन, दीपक चहर
पार्श्वभूमी
Chennai Super Kings vs Lucknow Super Giants IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. लखनौमधील एकाना मैदानात हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -