Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान बांगलादेशला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी 5 एप्रिलला हैदराबादविरुद्धच्या सामन्याला मुस्तफिजुर रहमान मुकण्याची शक्यता आहे. 


आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरु होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांचे क्रिकेट बोर्ड खेळाडूंच्या व्हिसासाठी तयारी करत आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डही खेळाडूंसाठी व्हिसा तयार करत आहे. याच कारणामुळे मुस्तफिजुर रहमानला बांगलादेशला जावे लागले. मुस्तफिजुर रहमानला पुन्हा भारतात येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मुस्तफिजुर वेळेवर पोहोचला नाही तर तो पुढील सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. 


बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 मेपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठीही मुस्तफिजुरला आपल्या देशात परतावे लागणार आहे. मुस्तफिजूरकडे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वेळ आहे. बोर्डाने त्याला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतच आयपीएलचे सामने खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे मोठे नुकसान होऊ शकते. आतापर्यंत मुस्तफिजुरने या हंगामात 3 सामन्यात 7 विकेटेस घेतल्या आहेत.


पर्पल कॅपच्या शर्यतीत मुस्तफिजुर अव्वल-


चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने 3 सामन्यात 106 धावा देत 7 विकेट घेतल्या आहेत. या आकडेवारीसह मुस्तफिजुर रहमान पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर मयंक यादवचे नाव येते. मयंकने दोन सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. चहलने आतापर्यंत तीन सामन्यांत 55 धावांत 6 बळी घेतले आहेत. तर मोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. मोहितने तीन सामन्यांत 93 धावांत 6 बळी घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या खलील अहमदने तीन सामन्यांत 88 धावांत ५ बळी घेतले आहेत. यासह खलील आता पाचव्या क्रमांकावर आहे.


पात्र ठरलेले 20 संघ...


अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 


गटवारी 


अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ


1 मे पूर्वी संघाची घोषणा करा-


आयसीसीने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघांच्या घोषणेची तारीख निश्चित केली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 20 संघांना 1 मे पूर्वी घोषणा करण्याची सूचना दिली आहे. तसेच 25 मे पर्यंत प्रत्येक संघाला त्यांच्या संघात फक्त एकच बदल करण्याची मुभा देखील असणार आहे. 


संबंधित बातम्या:


आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos


ट्रोलिंग, अपमान, डिवचलं....; मुंबईच्या सलग 3 पराभवानंतर हार्दिकने अखेर मौन सोडलं, काय म्हणाला?


Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video