KKR vs DC: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्ससमोर (Kolkata Knight Riders) दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) आव्हान असेल. विशाखापट्टणम येथे दोन्ही संघ भिडतील. सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.


दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 20 धावांनी पराभव केला. सध्या दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. श्रेयार अय्यरच्या संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादपाठोपाठ कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. 


विशाखापट्टणमची खेळपट्टी कशी असेल?


विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर फलंदाज सहज धावा करतात. या खेळपट्टीवर मोठे फटके खेळताना फलंदाजांना कोणतीही अडचण येत नाही. पण गोलंदाजांच्या अडचणी मात्र वाढतात. दोन्ही संघांचे गोलंदाज कठीण आव्हानाला कसे सामोरे जातात हे पाहणे रंजक ठरणार आहे. आतापर्यंत या मैदानावर 14 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 7 वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील 7 वेळा विजय मिळवला आहे.


कोणत्या संघाचा वरचष्मा?


आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स 32 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 16 सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सला 15 सामन्यांत यश मिळाले आहे. याशिवाय 1 सामन्याचा निकाल लागू शकला नाही. दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा वरचष्मा दिसून येत आहे. विशेषत: केकेआरचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, ते पाहता ऋषभ पंतसाठी आव्हान सोपे नसेल.


दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing XI-


ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ॲनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.


कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य Playing XI-


फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि अंगक्रिश रघुवंशी.


आज केकेआर अव्वल स्थान गाठणार?


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्यास त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची संधी असेल. त्याचवेळीदिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवल्यास गुणतालिकेत वर जाण्याची संधी असेल. तथापि, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट सध्या खराब आहे. 


संबंधित बातम्या:


ट्रोलिंग, अपमान, डिवचलं....; मुंबईच्या सलग 3 पराभवानंतर हार्दिकने अखेर मौन सोडलं, काय म्हणाला?


Mayank Yadav LSG: राजनाधी एक्सप्रेस...फक्त दोन सामने खेळला अन् मयंक यादवने स्वत:चाच विक्रम मोडला!


PSL अन् IPL मधील संघ एकमेकांना भिडणार; 10 वर्षांनी टी-20 लीग पुन्हा सुरु होणार?