Mayank Yadav LSG: आयपीएल 2024 च्या हंगामात काल लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. 


लखनौने प्रथम खेळून बंगळुरूला 182 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात आरसीबी अवघ्या 153 धावांत गारद झाला. या मोसमात आरसीबीचा घरच्या मैदानावरील हा तिसरा पराभव आहे. तर लखनौचा या हंगामातील दुसरा विजय आहे. लखनौच्या युवा गोलंदाजांनी आरसीबीला नमवले. यामध्ये वेगवान गोलंदाज मयंक यादवने पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केले. 






मयंक यादवने स्वत:चाच मोडला विक्रम 


21 वर्षीय मयंक यादव आपल्या पदार्पणाच्या सामन्यापासूनच खूप चर्चेत आहे. त्याने आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकला. आपल्या पहिल्या सामन्यात मयंकने पंजाब किंग्जविरुद्ध ताशी 155.8 किमी वेगाने चेंडू टाकला होता. आता मयंक यादवनेही हा विक्रम मोडला आहे. त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 156.7 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला. 






पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल कोण?


चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने 3 सामन्यात 106 धावा देत 7 विकेट घेतल्या आहेत. या आकडेवारीसह मुस्तफिजुर रहमान पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर मयंक यादवचे नाव येते. मयंकने दोन सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. चहलने आतापर्यंत तीन सामन्यांत 55 धावांत 6 बळी घेतले आहेत. तर मोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. मोहितने तीन सामन्यांत 93 धावांत 6 बळी घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या खलील अहमदने तीन सामन्यांत 88 धावांत ५ बळी घेतले आहेत. यासह खलील आता पाचव्या क्रमांकावर आहे.


गुणतालिकेत बदल-


आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. आता केएल राहुलच्या संघाचे 3 सामन्यांत 4 गुण झाले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सचे 4-4 गुण असले तरी केएल राहुलच्या संघाचा नेट रनरेट चांगला आहे. गुणतालिकेत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर कायम आहे. राजस्थान रॉयल्सचे 3 सामन्यांत 6 गुण आहेत. 


संबंधित बातम्या:


ट्रोलिंग, अपमान, डिवचलं....; मुंबईच्या सलग 3 पराभवानंतर हार्दिकने अखेर मौन सोडलं, काय म्हणाला?


Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video