IPL Betting : आयपीएलचा 15 वा हंगाम समाप्तीकडे झुकला आहे. आतापर्यंत 60 सामने झाले आहेत. स्पर्धेतील सर्वात यशस्वी मुंबई आणि चेन्नई संघाचे आव्हान संपुष्टात आलेय. तर गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. आयपीएल 2022 उत्तरार्धाकडे झुकला असतानाच आयपीएलमधील सट्टाबाज आणि फिग्सिंग संदर्भात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. हे प्रकरण 2019 मधील आहे. याप्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले आहे.
केंद्रीय तपास यंत्राणाने (Central Bureau of Investigation) शनिवारी मॅच फिग्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. 2019 मध्ये आयपीएलमध्ये झालेल्या सट्टेबाजी प्रकरणी या तिघांना सीबाआयने ताब्यात घेतले आहे. सीबीआयला या तपासात पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे. तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारतामध्ये काही मॅच फिग्सिंग रॅकेट सुरु आहे, याला पाकिस्तानमधून फूस मिळत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे... या तिघांना पाकिस्तानमधून मदत घेऊन आयपीएलमध्ये फिग्सिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
बेटिंगच्या माध्यामातून आयपीएलच्या सामन्याचा निकाल बदलवण्याचा प्रयत्न केला जातो. यातून सर्वसामान्य भारतीय लोकांना गंडवण्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे बँकमध्ये खाती उघडली जातात, जी बेटिंगसाठी वापरली जातात, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. दिलीप कुमार असे अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेले आरोपी आयपीएलमध्ये 2013 पासून सट्टेबाजी करत असल्याचे सीबीआयने म्हटलेय. तसेच पाकिस्तानमधील वाकास मलिक याच्या फोन क्रमांकही सीबीआयला तपासात मिळाला आहे. सीबीआय अधिक तपास करत आहे...
केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआय संपूर्ण भारतामध्ये सध्या आयपीएल सट्टेबाजी नेटवर्कचा तपास करत आहे. अनेक शहरांमध्ये तपास सुरु आहे. शनिवारी सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. या तिघांचा संबंध आयपीएल फिक्सिंग आणि सट्टेबाजीसोबत असल्याचे सांगितले. महत्वाचे म्हणजे, आयपीएलमध्ये पाकिस्तानमधून सट्टेबाजी केल्याचेही समोर आले. सीबीआयने तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये काही अज्ञात म्हणून असाही उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पाकिस्तानमधून सट्टेबाजीद्वारे आयपीएल सामन्याचा निकाल ठरवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटलेय.
आणखी वाचा :
- Ambati Rayudu: अंबाती रायडूच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? आधी निवृत्तीची घोषणा, त्यानंतर लगेच ट्वीट डिलीट
- IPL Playoffs 2022 : गुजरातचं स्थान निश्चित, इतर संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची किती संधी?
- IPL 2022: मुंबईच्या विजयाचा हिरो कुमार कार्तिकेयला धोनीकडून 'स्पेशल गिफ्ट'