IPL 2022 match tickets : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे दोन दिवस शिल्लक असून प्रेक्षकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळून सामने मैदानात जाऊन पाहण्याची परवानगी मिळाली आहे. IPL ने बुधवारी याबाबत एका प्रेस रिलीजमधून ही घोषणा केली. यावेळी मैदानात IPL सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची एकूण क्षमता 25% ठेवण्य़ात आली असून आता सामना पाहण्यासाठी ऑनलाईन तिकीटांची विक्रीही सुरु झाली आहे.


शनिवार 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार असून सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहेत. दरम्यान नुकत्याच जाहीर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आलं आहे की,'वानखेडे स्टेडियममध्ये 26 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट राईडर्स सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या या 15 व्या सीजनला प्रेक्षकांचं स्वागत आहे.' 


अशी खरेदी करु शकता तिकीट


आयपीएलच्या प्रेस रिलीजमध्ये तिकीट खरेदी करण्याबाबत दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, 'क्रिकेट चाहते 23 मार्च दुपारपासून IPL च्या ऑफिशियल वेबसाइट www.iplt20.com आणि www.BookMyShow.com वर IPL 2022 च्या लीग फेजमधील सामन्यांची तिकीटं खरेदी करु शकता. सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील मैदानात खेळवले जाणार आहेत. COVID-19 प्रोटोकॉलनुसार मैदानात एकूण क्षमतेच्या 25% सीटांवर प्रेक्षकांना अनुमती देऊन सामने खेळवले जातील. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha