IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने मुंबईत वानखेडे (Wankhede Stadium), डीवाय पाटील (DY Patil) आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडिअमवर खेळले जाणार आहेत. कोरोनामुळं आयपीएलचे मागील दोन्ही हंगाम प्रेक्षकांविना खेळवण्यात आले होते. मात्र, यंदाचा हंगाम प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोविडची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल, जेणेकरुन प्रेक्षकांना आयपीएलचे सामने पहण्यासाठी स्टेडियमवर परवानगी देता येईल, अशी अपेक्षा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलीय. 


महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होताना दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी दिली जाण्याची अपेक्षा आहे, असं सुनील केदार यांनी म्हटलंय. प्रेक्षकांना मैदानात परवानगी देणं, हे खेळाडूंना प्रोत्साहन देणारं ठरेल. तसेच लोक एकत्र येण्याची एक चांगली संधी असेल. लोक गेल्या दोन वर्षापासून घरात बसले आहेत, असंही सुनील केदार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. यासंदर्भात इंडिया टूडेनं दिले आहे.


मुंबईतील वानखेडे मैदानावर 20, ब्रेबॉन मैदानावर 15, डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघाला समान संधी मिळेल यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक संघाचे चार चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअम या मैदानावर होणार आहे. तर प्रत्येक संघाचे तीन तीन सामने ब्रेबॉन आणि पुणे मैदानावर होणार आहेत. प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 14 सामने खेळणार आहे. त्यामध्ये पाच संघाविरोधात प्रत्येक संघाला दोन तर चार संघाविरोधात एक एक सामना खेळावा लागणार आहे.


हे देखील वाचा-