Lucknow Super Giants : लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 साठी त्यांची जर्सी आणि थीम साँग लाँच केलं आहे. हे थीम साँग प्रसिद्ध रॅपर बादशाहने (Rapper Badshah) गायलं आहे. 'पुरी तैयारी है.. अब अपनी बारी है' असे या गाण्याचे बोल आहेत. लखनऊ सुपर जायंट्स 28 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आयपीएल पहिल्या पर्वाची सुरुवात करणार आहे.


लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या सोशल मीडियावर जर्सी आणि थीम साँग शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये टीमचा कर्णधार केएल राहुल पहिल्यांदा या जर्सीत दिसत आहे. बादशाह संघाची जर्सी घालून गाताना आणि नाचतानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण संघाच्या जर्सीच्या दिसत आहे.






 


लखनौ ही आयपीएलमधील नवीन फ्रँचायझी आहे. संजीव गोयंका यांनी ही फ्रेंचायढी विकत घेतली आहे. या संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे देण्यात आलं आहे. त्याचबरोबर दोन वेळा आयपीएल जिंकणारा गौतम गंभीर या संघाच्या मेंटरच्या भूमिकेत आहे. फ्रँचायझीने अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.


लखनौ संघ : केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मनन खान, आयुष बधोनी, काइल मायर्स, कर्ण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव आणि बी साई सुदर्शन.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha